जे. पी. नड्डांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल गृहमंत्रालयाने मागवला खुलासा

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर परवा झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

नवी दिल्ली :  भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर परवा झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेबाबत राज्यपाल जगदीप धनकर यांनी रातोरात पाठविलेला अहवाल मिळताच केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवून राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना येत्या १४ डिसेंबरला दिल्लीत हजर राहून खुलासा करण्याचे फर्मान काढले होते. पण तेही राज्य सरकारकडून धुडकावून लावण्यात आले आहे. आम्हाला या बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसल्याचे मुख्य सचिव अल्पान बंदोपाध्याय यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

 

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मोदी सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करण्याचा मार्ग चोखाळण्याची शक्‍यता नाही. मात्र यातून राजकीय परिस्थिती आणखी अनुकूल करण्यासाठी आवश्‍यक ती कारवाई केंद्राकडून होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांवर कारवाईचे अधिकार केंद्राकडेही असतात असे भाजपचे म्हणणे आहे. पण ममतांनी केंद्राच्या आदेशांना केराची टोपली दाखविली. कालच्या हल्ल्यासाठी भाजपने तृणमूलला जबाबदार ठरविले. या घटनेत कैलास विजयवर्गीय यांचा हात फ्रॅक्‍चर झाला आहे. गाडी बुलेटप्रूफ नसती तर  या दगडफेकीत काही वेगळेच घडले असते अशी शंका नड्डा यांनी व्यक्त केली.

 

अधिक वाचा :

केंद्राने कृषी कायदे संसदेमध्ये मंजूर करण्यापूर्वी त्यावर पुरेशी चर्चा केली नाही 

 

 

संबंधित बातम्या