गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कैद्यांची सुटका करू नये: गृह मंत्रालय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

दहशतवादी कारवाया आणि क्रूर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात येऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

नवी दिल्ली: तुरुंगातील कैद्यांना पॅरोल अथवा फर्लोवर (संचित रजा) सरसकट सोडणे योग्य नाही. अशा प्रकारे कैद्यांची सुटका करताना योग्य प्रकारे पात्रता नियमांचा आधार घेतला जावा, दहशतवादी कारवाया आणि क्रूर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात येऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. 

दैनंदिन कार्यप्रणालीतील घटक म्हणून पॅरोल अथवा फर्लो मंजूर करता येत नाही. लैंगिक शोषणाचे गुन्हे, खून, बालकांचे अपहरण आणि हिंसाचार आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कैद्यांना सोडताना विविध बाबींचा गांभीर्याने विचार करावा लागतो असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या