Honey Trap म्हणजे काय, सौंदर्याचा सापळा रचून कसे अडकवले जाते? वाचा सविस्तर

Honey Trap Case: अनेकदा लष्करी जवान हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील.
Honey Trap
Honey TrapDainik Gomantak

Honey Trap Case: अनेकदा लष्करी जवान हनीट्रॅपमध्ये अडकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. ताजे प्रकरण राजस्थानमधून समोर आले आहे, जिथे लष्करी जवान हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानी दलालांना गुप्त माहिती देत ​होता. परंतु सर्वसामान्यांच्या मनात हा प्रश्न येतो की, हे हनीट्रॅप आहे तरी काय? तर आज आम्ही तुम्हाला हनीट्रॅप म्हणजे काय आणि त्यात लोक कसे अडकतात, त्यातून गुपिते कशी उघड केली जातात याबद्दल सांगणार आहोत.

हनीट्रॅप म्हणजे काय?

हनीट्रॅप (Honey Trap) हे खरे तर एक 'हेरगिरीची पद्धत' आहे. गुप्त माहिती मिळवण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जातो. यामध्ये साधारणपणे सुंदर मुलींचा वापर करुन व्यक्तींकडून गुप्त माहिती मिळवली जाते. फोटो, व्हिडिओ किंवा मेसेजच्या (Message) माध्यमातून ब्लॅकमेल केले जाते. यामध्ये मुली अनेकदा टार्गेट व्यक्तीला त्यांच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवतात आणि विशिष्ट मुद्द्यावर त्यांच्याकडून माहिती मिळवतात.

Honey Trap
Yo Yo Honey Singh ला शो दरम्यान अज्ञातांकडून धक्का बुक्की, FIR दाखल

राजस्थानमधील एका जवानाला अटक

खरे तर, राजस्थान पोलिसांच्या (Police) गुप्तचर पथकाने भारतीय लष्कराच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. लष्कराची माहिती पाकिस्तानी दलालांना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दुसरीकडे, असे सांगितले जात आहे की, तो भारतीय लष्कराशी संबंधित माहिती आणि व्हिडिओ पाकिस्तानी महिलांना (Women) पाठवत होता. त्यामुळे राजस्थानच्या (Rajasthan) गुप्तचर पथकाने या जवानाला हेरगिरीच्या गुन्ह्यात अटक केली. आरोपी जवान शांतमय राणा (24) हा राजस्थान येथे तैनात असून त्याला दोन महिलांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com