हाँगकाँग सुरक्षा कायदा मंजूर

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

चीनला या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे

बीजिंग

हाँगकाँगच्या स्वायत्ततेचा भंग करत असल्यामुळे आंदोलनाचे कारण ठरलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा मसुदा चीनच्या संसदेने आज मंजूर केला. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने विधेयकाचा आढावा घेऊन त्याला मंजुरी दिली. या विधेयकात बंडखोरी, चीनच्या अधिकारांना आव्हान, दहशतवादी कारवाया आणि विदेशी शक्तींशी हातमिळवणी करून सुरक्षेला आव्हान निर्माण केल्याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे स्वायत्त हाँगकाँगमधील कायदा यंत्रणेला हातात घेण्याचा चीनचा डाव असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. तसेच, गुन्ह्याची व्याख्या स्पष्ट न केल्याने कोणत्याही कृतीला चीन सरकार त्यांच्या मर्जीप्रमाणे देशद्रोह किंवा बंडखोरी ठरवून दडपशाही करेल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलकांचा आणि जगातील अनेक देशांचा विरोध डावलून चीनला या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे

संबंधित बातम्या