या प्राण्याच्या शिंगाना सोन्यापेक्षाही जास्त भाव 

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

गेंडा (Rhinoceros) या प्राण्याचे एक शिंग सोन्यापेक्षाही महाग आहे.

नवी दिल्ली : भारतात सोन्याकडे एक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. खास करून स्त्रियाना याची आवड अधिक असते.  सध्या देशात महामारीमुळे सोन्याचे भाव वधारले आहे. त्यामुळे लग्नसमारंभ सारख्या शुभकार्यासाठी उत्सुक असलेले लोकांचे बजेट कोलमडले आहे. परंतु अनेक गोष्टी अशा आहेत की जय सोन्यापेक्षाही महाग आहे. यामध्ये एका प्राण्याच्या शिंगाचा समावेश आहे. त्या प्राण्याच्या शिंगाची किंमत लाखों रुपये आहे. गेंडा (Rhinoceros) या प्राण्याचे एक शिंग सोन्यापेक्षाही महाग आहे. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की गेंडयाची शिंग एवढी महाग का आहे ? तसेच यामुळे गेंडयाची शिकार वाढली आहे. त्यांच्या बचावासाठी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.    (The horns of this animal cost more than gold)   

Yass Cyclone: येत्या 24 तासात वादळ बंगालला धडकणार!

तुम्ही अनेकदा वाचले असेल की गेंडयाच्या शिकरीत वाढ झाली आहे. शिकरीचे कारण म्हणजे या प्राण्याचे शिंग होय. गेंडयाची शिंग बाजारात बेभाव विकली जातात आणि याचा काळा बाजार आहे. खर सांगायचं झाले तर गेंडयाच्या शिंगामध्ये विशेष अशी तत्वे आढळतात. ही तत्वे अनेक औषधामध्ये उपयुक्त आहे. या शिंगांची काळ्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे. 

शिंगांचे वैशिष्ट -

या प्राण्याच्या शिंगामध्ये केराटीन असते. याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक असते. या केराटीनमुळे गेंडयाची शिंगे जास्त किंमतीत विकल्या जातात.यामुळे अनेक गेंडयाची शिकार केली जात आहे.
या शिंगाना चीनमध्ये जादूचे औषध म्हणून ओळखले जाते. ही शिकार रोखण्यासाठी जगात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. यामुळेच अनेकजन गेंड्याच्या शिंगाचा व्यवहार कायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामुळेच सिंगाची ठराविक किंमत ठरवल्यास शिकारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गेंड्याची  शिंग कापल्यास त्याला कोणताच त्रास होत नाही. हे करणे म्हणजे  एखाद्या व्यक्तीचे केस किंवा नखे ​​तोडण्यासारखे आहे. यामुळे त्यांना त्रास होत नाही. गेंड्याची एकदा शिंग कापले की ते परत येतात. गेंड्याच्या शिंगामध्ये आढळणार केराटिन आशियामध्ये सोन्यापेक्षा अधिक किंमतीत विकल्या जाते.

26 मे ला आकाशात पहावयास मिळणार 'सुपर मून'

गेंड्याची  शिंग प्रति किलो 1 लाख डॉलर्सपर्यंत विकल्या जातात. म्हणजेच, भारताच्या अर्थव्यवस्थेनुसार, एका शिंगाची किंमत लाखो रुपये आहे. 2020 च्या एका अहवालानुसार गेल्या दहा वर्षात देशभरात एक शिंगवाल्या 102 गेंड्यांची शिकार केली गेली आहे. गेल्या दोन वर्षांत 32 गेंडे शिकारीमुळे मारले गेले आहेत. सध्या फक्त तीन हजाराहून अधिक भारतीय गेंडे जगंलामध्ये जिवंत आहेत. त्यातील सुमारे 2000 गेंडे आसाममध्ये आढळतात. 

 

 

संबंधित बातम्या