कोरोनाबाधित मंत्र्यांची रुग्णालयात सेवा; साफसफाई करतानाचा फोटो होतोय व्हायरल

दैनिक गोमंतक
शनिवार, 15 मे 2021

रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर मंत्री महोदयांनी आपल्या कृतीतून अनेकांची मने जिंकली.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच आता मिझोरममधील (Mizoram) एका मंत्र्यांचा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते करत असलेल्या कामाचं नेटकऱ्यांकडून चांगलचं कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोला कंमेट्सही केल्या आहेत. राजकीय पुढाऱ्यांचे व्हीआपी कल्चर बाजूला ठेवून आर.लालझिरलियाना (R.Lalzirliana) एका रुग्णालयामध्ये साफसफाई करताना दिसत आहेत. त्यांचा साफसफाई करतानाचा फोटो सोशल मिडियावर अवघ्या काही तासातच प्रचंड व्हायरल झाला आहे. (Hospital service of coronated ministers The photo while cleaning is going viral)

मिझोरमचे उर्जामंत्री आर. लालझिरलियाना हे सध्या कोरोनाबाधित असून झोरम मेडिकल कॉलेज (Zoram Medical College) रुग्णालयात सेवा देत आहेत. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले होते. 12 मे पासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची पत्नी आणि मुलांना होमक्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर मंत्री महोदयांनी आपल्या कृतीतून अनेकांची मने जिंकली.

Coronavirus: सैन्यातील सेवानिवृत्त डॉक्टर देशाच्या मदतीला...

‘’रुग्णालयामधील फरशीवर पडलेला कचरा साफ करण्यासाठी रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याला बोलवलं होतं. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाल्यानंतर मी स्वत:च फरशी पुसायला सुरुवात केली’ असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं. 'झाडू मारणं फरशी पुसणं हे काम माझ्यासाठी काही नवीन नाही. हे काम मी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी गरज पडल्यास करतो. आमदार मंत्री असलो तरी स्वताला इतरांपेक्षा वेगळं समजत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. माझ्या या कृतीतून नर्स किंवा डॉक्टरांना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. रुग्णालयामधील डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ माझी व्यवस्थित काळजी घेत आहेत,’’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आर.लालझिरलियाना यांची स्वच्छता करण्य़ाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआगोदरही त्यांनी दिल्लीमधील मिझोरम निवासस्थानात स्वच्छता केली होती. तेव्हाही त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं.

संबंधित बातम्या