मुस्लीम तरुणाच्या याचिकेवर सरकार म्हणाले, 'हिंदू तरुणीला पळवून नेण्यावरुन...'

एका हिंदू मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून आपले घर पाडण्यात आल्याचा आरोप या तरुणाने सरकारवर केला
मुस्लीम तरुणाच्या याचिकेवर सरकार म्हणाले, 'हिंदू तरुणीला पळवून नेण्यावरुन...'
high courtDainik Gomantak

एका मुस्लिम तरुणाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुरक्षेविरोधात याचिका दाखल केली होती आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरातून पळून जाऊन हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा आरोप एका मुस्लिम तरुणावर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच तरूणाने उच्च न्यायालयात धाव घेत आपली याचिका दाखल केली आहे. एका हिंदू मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून आपले घर पाडण्यात आल्याचा आरोप या तरुणाने सरकारवर केला आहे. (Madhya Pradesh Government)

याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात मुस्लिम तरुणाचे घर पाडण्यात आलेले नाही, तर अतिक्रमण करून बांधलेले घर पाडण्याची आले आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान दिंडोरीतील शाहपुरा भागात आसिफ नावाच्या तरुणाविरुद्ध 5 एप्रिल रोजी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. हिंदू तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, 'तरुणाने आमच्या मुलीला जबरदस्तीने बसमधून उतरवले आणि पळवून नेले.' संरक्षणाची मागणी आणि पोलिसांनी नोंदवलेल्या फौजदारी गुन्ह्याच्या विरोधात तरुण आणि तरुणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रशासनाने तरुणाच्या वडिलांचे घर आणि भावाचे दुकान पाडले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

 high court
NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना केंद्राकडुन Z+ सुरक्षा

तसेच, उच्च न्यायालयाने एफआयआरवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश देताना याचिकाकर्त्यांना नोटीस बजावून उत्तर मागवले होते. तरुणावर एफआयआर दाखल झाल्यामुळे त्याच्या वडिलांचे घर पाडण्यात आलेले नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या पुर्वी अतिक्रमणाबाबत मुस्लीम तरुणाच्या वडिलांना प्रशासनाकडून रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर तरुणाचे वडील 30 मार्च रोजी समितीसमोर हजर झाले होते. 6 एप्रिल रोजी समितीने हे अतिक्रमण शोधून काढण्याचे आदेश दिले होते. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती.

या तरुणाचे वडील हलीम खान यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आसिफ खान याने हिंदू समाजातील मुलीवर प्रेम केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्याची शिक्षा भोगावी लागली. प्रशासनाने 7 एप्रिल रोजी मुलाचे दुकान आणि 8 एप्रिल रोजी घर अतिक्रमण म्हणून पाडले होते. सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती. याशिवाय अनेक अधिकारी आणि राजकारण्यांनी हिंदू मुलीचे अपहरण करणाऱ्याचे घर फोडल्याचे सोशल मीडियात नमूद केले होते.

 high court
सोनिया गांधींनी ईडीला केली विनंती, चौकशी दोन दिवसांनी पुढे ढकलावी

अधिवक्ता अमानुल्ला उस्मानी यांनी सांगितले की, 'त्यांनी आसिफच्या वतीने याचिका सादर केली आहे. सरकारने सादर केलेल्या उत्तरात खोटी माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात ते पुराव्यासह न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com