असे काम करते डीआरडीओ'ने बनवलेले कोरोना प्रतिबंधक औषध; वाचा सविस्तर 

दैनिक गोमंतक
रविवार, 9 मे 2021

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) बनवलेल्या 2-डीऑक्सी-डी ग्लूकोज या औषधाला  आपत्कालीन वापरासाठी  औषध महानियंत्रकाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नव्हते.

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) बनवलेल्या 2-डीऑक्सी-डी ग्लूकोज या औषधाला  आपत्कालीन वापरासाठी  औषध महानियंत्रकाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. मात्र डीआरडीओ'ने बनवलेल्या औषधाला देशात पहिल्यांदाच मंजुरी मिळाली आहे.  एएस 2-डीजी'  या औषध प्राथमिक उपचारांसाठी वापरण्यास मंजुरी मिळाली आहे.  (This is how DRDO's corona preventative drug works; Read detailed) 

10 वर्षाच्या भारतीय मुलीनं रचला इतिहास! जाणून घ्या

वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेड्डीच्या प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे औषध लवकरच बाजारात आणण्याचे काम सुरू असून ते लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असेकरच उपलब्ध होईल, असे डॉ. भट्ट यांनी म्हटले आहे. 

एएस 2-डीजी  औषध कसे काम करते ? 
> 2-डीऑक्सी-डी ग्लूकोज किंवा 2-डीजी असे या औषधाचे नाव आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस इंस्टिट्यूट आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी विकसित केले आहे.

> हे औषध पावडर स्वरूपातील असून ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. 

> 2-डीऑक्सी-डी ग्लूकोज या औषधाने रुग्णालयात दाखल झालेले कोरोनाबाधित रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत करते. 

>2-डीऑक्सी-डी ग्लूकोज औषधाने रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करते. 

> 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये हे औषध प्रभावी आहे.

>हे औषध कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवरही प्रभावी ठरेल, असी माहिती डीआरडीओ वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी दिली आहे. 

> हे औषध सामान्य उत्पादन आणि ग्लूकोजचे alogनालॉग असल्याने देशात मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाऊ शकते.

> कोरोना बाधित रुग्णाला हे औषध दिल्याने त्यांच्या शरीरातील विषाणूग्रस्त पेशींमध्ये हे औषध जमा होते आणि विषाणूची वाढ थांबवते. 

संबंधित बातम्या