Monkeypox विषाणूचा संसर्ग कसा पसरतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स विषाणूने भारतातही प्रवेश केला आहे.
Monkeypox Virus Latest News
Monkeypox Virus Latest NewsDainik Gomantak

Monkeypox virus: जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स विषाणूने (Monkeypox virus) भारतातही प्रवेश केला आहे. तर केरळमधील कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण नुकताच संयुक्त अरब अमिरातीहून भारतामध्ये परतला होता. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, संशयिताला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. चाचणी दरम्यान त्याला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका अहवालानुसार, आतापर्यंत 73 देशांतील 10,800 हून अधिक लोकांना मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. (Monkeypox virus Learn the symptoms and remedies)

Monkeypox Virus Latest News
INS Dunagiri: 'दुनागिरी' युद्धनौका नौदलात सामील, समुद्रात भारताची ताकद वाढणार

भारतात या विषाणूचा संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) एक उच्चस्तरीय पथक केरळमध्ये पाठवले आहे. गुरुवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गावर पाळत ठेवण्यासाठी भर देण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले की सर्व संशयितांची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे. मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, तो कसा पसरतो, त्याची लक्षणे काय आहेत, या संसर्गावर काही उपचार किंवा लस आहे का? ते किती धोकादायक आहे हे जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे?

मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय?

1. मंकीपॉक्स हा एक झुनोसिस विषाणू आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. माकडांव्यतिरिक्त, हा विषाणू उंदीर, गिलहरी आणि डॉर्मिस यांसारख्या प्राण्यांमध्ये आढळून येतो. मंकीपॉक्स विषाणू हा स्मॉलपॉक्स विषाणू पैकीच एक आहे.

2. मंकीपॉक्स पहिल्यांदा 1958 मध्ये एका माकडात सापडला होता, त्यानंतर 1970 मध्ये तो 10 आफ्रिकन देशांमध्ये पसरला होता. त्याची प्रकरणे पहिल्यांदा 2003 मध्ये अमेरिकेमध्ये नोंदवली गेली आहेत.

Monkeypox Virus Latest News
Patiala House Court: Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांचा जामीन मंजूर

3. मांकीपॉक्सचा सर्वात मोठा उद्रेक 2017 मध्ये नायजेरियामध्ये झाला होता, त्यातील 75% रुग्ण हे पुरुष होते. या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे पहिल्यांदा यूकेमध्ये 2018 मध्ये नोंदवली गेली आहेत.

4. चेचक नंतर, मंकीपॉक्स हा सार्वजनिक आरोग्यासाठी ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणून उदयास आला. मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणे मध्य आणि पश्चिम आफ्रिकेसारख्या उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्टच्या जवळच्या भागामध्ये आढळून येतात.

5. या विषाणू संसर्गावर उपचार देखील उपलब्ध आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण सुमारे 3-6% एवढे आहे.

6. सध्या, मंकीपॉक्स मुख्यतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांच्या काही भागांमध्ये आढळून येत आहे. या वर्षी 6 मे रोजी ब्रिटनमध्ये सापडलेला पहिला रुग्ण नायजेरियामधून परतला होता.

मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग किती धोकादायक आहे?

WHO च्या मते, मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ विषाणू आहे, ज्याचा संसर्ग काही प्रकरणांमध्ये गंभीर देखील असू शकतो. या विषाणूचे दोन प्रकार आहेत - पहिला कॉंगो स्ट्रेन आणि दुसरा पश्चिम आफ्रिकन स्ट्रेन असे या विषाणूनीची नावे आहेत. दोन्ही स्ट्रेन 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना होतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. कॉंगो स्ट्रेनच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मृत्यू दर 10% आहे आणि पश्चिम आफ्रिकन स्ट्रेनच्या संसर्गाच्या बाबतीत, मृत्यू दर 1% एवढा आहे.

Monkeypox Virus Latest News
HC On Mangalsutra: पत्नीचे मंगळसूत्र काढणे ही मानसिक क्रूरता: उच्च न्यायालय

मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गाची लक्षणे काय?

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्सची लक्षणे संक्रमणाच्या 5 व्या दिवसापासून ते 21 व्या दिवसापर्यंत दिसून येऊ शकतात. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थरथर कापणे, थकवा आणि सुजलेल्या लिम्फ नोड्ससह प्रारंभिक लक्षणे फ्लूसारखी आढळून येतात. यानंतर, चेहऱ्यावर पुरळ येऊ लागतात, जी शरीराच्या इतर भागातही पसरतात. संसर्गादरम्यान, ही पुरळ अनेक बदलांमधून जाते आणि कालांतराने कांजिण्या सारखी खरुज बनून पडतात. तापानंतर शरीरावर पुरळ दिसून आल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मंकीपॉक्स विषाणू मानवांमध्ये कसा पसरतो?

मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने ते मानवांमध्ये पसरण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा विषाणू रुग्णाच्या जखमेतून बाहेर आल्यानंतर डोळे, नाक आणि तोंडातून शरीरामध्ये प्रवेश करतो. हा संसर्ग माकडे, कुत्रे आणि गिलहरी यांसारख्या प्राण्यांद्वारे किंवा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अंथरुण आणि कपड्यांद्वारे देखील पसरू शकतो. संक्रमित व्यक्ती फक्त एका व्यक्तीला संसर्ग पसरवू शकते तर अशाप्रकारे संपर्क शोधणे आणि रुग्णाला वेगळे करणे सोपे असते. तज्ञांच्या मते, उच्च जोखीम असलेल्या मंकीपॉक्सच्या रुग्णांना 21 दिवसांसाठी वेगळे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com