लखनऊ-शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीमध्ये भीषण आग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

लखनऊ-शताब्दी एक्सप्रेसच्या लगेज बोगीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

गाझीयाबाद: लखनऊ-शताब्दी एक्सप्रेसच्या लगेज बोगीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गाझियाबाद स्थानकात ही गाडी तासभर थांबली होती. सुमारे दीड तासानंतर आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. 

मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कुमार सिंह म्हणाले की, सकाळी सात वाजता शताब्दी एक्सप्रेसला आग लागल्याची माहिती मिळाली. तातडीने 6 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ही आग रेल्वेच्या शेवटच्या जनरेटर आणि सामान वाहन बोगीमध्ये लागली होती.

तातडीने बोगीला रेल्वेच्या भागापासून वेगळे करून आग विझवण्यास सुरवात केली. आग लागल्याने बोगीचे दोन्ही दरवाजे उघडले जात नव्हते. दरवाजांना तोडून आग आटोक्यात आणली गेली आहे. सुदैवाने या भयानक आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या