'प्रेमसंबंध,' महिलेला खांबाला बांधून मारहाण, पतीसह 5 जणांना अटक

बिहारमधील (Bihar) रोहतास येथील चेनारी भागातील सिंहपूर गावात प्रेमप्रकरणाच्या आरोपावरुन महिलेला खांबाला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Crime
CrimeDainik Gomantak

बिहारमधील रोहतास येथील चेनारी भागातील सिंहपूर गावात प्रेमप्रकरणाच्या आरोपावरुन महिलेला खांबाला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेच्या संदर्भात असे सांगितले जात आहे की, 'तीन मुलांच्या आईवर पतीने प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता.' हे प्रकरण पोलीस (Police) ठाण्यात पोहोचल्यावर स्थानकप्रमुखांच्या उपस्थितीत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र गावात आल्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला विद्युत खांबाला बांधून ग्रामस्थांच्या उपस्थितीत मारहाण करण्यास सुरुवात केली.

Crime
पटियाला हिंसाचाराचा मास्टरमाईंड बरजिंदर सिंग परवाना गजाआड

दरम्यान, याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी महिलेचा पती दीपक राम, सासरा शिवपूजन राम यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांना ही कारवाई केली. पोलीस ताफ्यासह दाखल झाले आणि महिलेची सुटका केली. महिलेला दारात असलेल्या विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला (Women) तीन मुलांची आई आहे.

दुसरीकडे, रोहतासचे एसपी आशिष भारती यांनी सांगितले की, ''पोलिसांना माहिती मिळाली की एका महिलेला खांबाला बांधून मारहाण केली जात आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिलेची सुटका केली. या प्रकरणात दीपक राम, शिवपूजन राम, केदार राम, धीरेंद्र राम आणि नरेंद्र राम यांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेतील अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.''

Crime
''गोव्यात दुसऱ्या लग्नाचा अधिकार...'' : असदुद्दीन ओवेसी

याशिवाय, महिलांच्या सुरक्षेसाठी रोहतास पोलीस कटिबद्ध असून असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com