नोकरी सोडण्यास नकार दिल्याने पतीने दिला तलाक, 27 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

तिहेरी तलाकवर (Triple Talaq) कायदा लागू झाल्यानंतरही मुस्लीम महिलांसोबत घटस्फोटाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.
नोकरी सोडण्यास नकार दिल्याने पतीने दिला तलाक, 27 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
Triple TalaqDainik Gomantak

तिहेरी तलाकवर कायदा लागू झाल्यानंतरही मुस्लीम महिलांसोबत घटस्फोटाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) जिल्ह्यातून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये मुलांचं पालणपोषण करणाऱ्या महिलेने नोकरी सोडण्यास नकार दिल्यानंतर तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक (Triple Talaq) दिला. यानंतर पतीने दर्गाह आला हजरत येथून तिहेरी तलाकच्या बाजूने शरई फतवा आणला. जेव्हा करार होतो तेव्हा पती आपल्या पत्नीवर हलालासाठी दबाव टाकत असतो. आरोपी पती आणि सासरच्यांविरोधात कारवाईसाठी महिलेने बारादरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या महिलेचा पती फरार आहे.

दरम्यान, हे प्रकरण बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इथे राहणार्‍या महिलेचा विवाह 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1995 मध्ये जगतपूर पशुपती विहार कॉलनीत राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, 'मला 24 वर्षांची मुलगी आणि तीन मुले आहेत. एक मुलगी आजारी असते.' लग्न (Marriage) झाल्यापासून सासरचे लोक माझा छळ करत होते, असा आरोप या महिलेने केला आहे. त्याचवेळी दारु पिऊन पती तिला मारहाण करायचा. तिच्या मोठ्या मुलीला लहानपणापासून आजार आहे. पतीच्या व्यसनामुळे तिला आपल्या मुलीवर उपचार करता आले नाही. नवरा आपली सगळी कमाई दारुत खर्च करायचा. तिहेरी तलाकची धमकी देणे आणि खर्चाची मागणी करुन महिलेला मारहाण करायचा.

Triple Talaq
'...मध्यप्रदेशातही राष्ट्रगीत अनिवार्य होऊ शकते': गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

नंदोई आणि जेठ यांच्याकडून हलाला करण्याचा दबाव

नवरा फेब्रुवारीमध्ये कामासाठी मेरठला गेला होता. नुकताच तो घरी परतला. 18 एप्रिल रोजी महिला ड्युटीवर जाण्यासाठी तयार होती. यादरम्यान आरोपी पतीने नोकरी सोडण्यासंबंधी पत्नीला बोलला. परंतु महिलेने (Women) मुलांसाठी नोकरी करण्याचा हट्ट धरला. यावर आरोपी पतीने तिहेरी तलाक देऊन पत्नीला घरातून हाकलून दिले. त्यानंतर गुपचूप एका दर्ग्यातून तिहेरी तलाकबाबत शरईचा निकाल आणण्यासाठी गेला. आता आरोपी पती महिलेला एकत्र ठेवण्यासाठी नंदोई आणि भावजयीसोबत हलाला करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. नकार दिल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी देत आहे.

पीडितेने मदत मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याकडे धाव घेतली

पीडितेने 'मेरा हक फाऊंडेशन' नावाची एनजीओ चालवणाऱ्या फरहत नक्वीशी संपर्क साधला. पीडितेने संपूर्ण घटनाक्रम सांगून त्यांच्याकडे मदतीची याचना केली. त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना फाउंडेशनच्या अध्यक्षा फरहत नक्वी यांनी सांगितले की, महिलेला तिच्या पतीने मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिले. हलालाचा दबाव तिच्यावर आणला जात आहे. नक्वी पुढे म्हणाल्या की, तिहेरी तलाकप्रमाणेच हलालाविरोधातही कायदा सरकारने केला पाहिजे.

Triple Talaq
उत्तर प्रदेशमध्ये मदरशात राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य

तिहेरी तलाक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल

त्यामुळे नाराज झालेल्या पीडितेने बारादरी पोलिस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरुद्ध तिहेरी तलाक अंतर्गत छळाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी एसपी सिटी रवींद्र कुमार सांगतात की, बारादरी पोलिस (Police) ठाण्यात महिलेचा पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.