
Uttar Pradesh Crime: बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारात एक तरुण दोन लाख रुपये हरला. पैसे नसल्याने त्याने पत्नीला आपल्या जुगारी मित्राला सोपवले.
दरम्यान महिलेने आपल्या मुलीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिला ओलीस ठेवून मारहाण करण्यात आली. सध्या पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांवर एफआयआर दाखल केला आहे.
महिलेने सांगितले की, तिचे सासरचे लोक हुंडा म्हणून अडीच लाख रुपयांची मागणी करत होते. तर पती गौरव वर्मा दारु पिऊन रात्रभर जुगार खेळायचा आणि शिवीगाळ करायचा. मात्र, विरोध केला असता सासरच्यांनी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने खोलीत कोंडून ठेवले.
महिलेने (Women) पुढे सांगितले की, गौरव जुगारात दोन लाख रुपये हरला होता. त्याचदम्यान त्याने एका व्यक्तीला रुममध्ये आणले. जर तु त्याला खुश केले तर दोन लाख रुपये माफ करु, असे त्याने त्याला सांगितले होते. हे ऐकून ती खूपच घाबरली आणि तिने तिथून आपल्या मुलीसह पळ काढण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान, सासरच्यांनी तिला पकडून खोलीत ओलीस ठेवले आणि मारहाण केली. आरोपी मेव्हणा शुभमने तिचा विनयभंग केला. यानंतर तिला मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिले होते. तेव्हापासून ती तिच्या माहेरी राहत होती.
प्रेमनगर पोलिसांनी आरोपी - पती, सासरा, सासू, सासरे यांच्या विरोधात हुंडा, मारहाण, धमकावणे, विनयभंग अशा विविध कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.