ह्युंदाईची नवी 7 सीटर एसयूव्ही अल्काझार; कंपनीने रिलीज केला व्हिडीओ

ह्युंदाईची नवी 7 सीटर एसयूव्ही अल्काझार; कंपनीने रिलीज केला व्हिडीओ
Hyundai will soon launch its 7-seater SUV Alcazar in the Indian market.

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई लवकरच आपली 7 सीटर एसयूव्ही अल्काझर (Alcazar) भारतीय बाजारात घेऊन येणार आहेत. या एसयूव्हीच्या लॉन्चिंगबद्दल बाजारात अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. कंपनीने नुकताच एक 38 सेकंदाचा अधिकृत व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये फ्रंट प्रोफाइलपासून मागील आणि साइड प्रोफाइलपर्यंत या 7 सीटर एसयूव्हीचा लूक  आपल्याला पाहता येऊ शकतो. (Hyundai will soon launch its 7-seater SUV Alcazar in the Indian market.) 

ह्युंदाईने लॉन्च केलेला हा व्हडिओ पाहिल्यानंतर ग्राहकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसते आहे. या नव्या 7 सीटर एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल विशेष बाब म्हणजे कंपनीने फ्लॅटर रूफलाइनसह एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प दिले आहेत.  याशिवाय सी कॉलम आणि सी शेप एलईडी टेल लॅम्पसह नवीन रियर बम्पर या एसयूव्हीच्या मागील भागाला अधिकच आकर्षक बनवते. तसेच कंपनी या एसयूव्हीला 18 इंचाचे अ‍ॅलोय व्हील सुद्धा देणार असल्याचे समजते आहे, जे क्रेटापेक्षा मोठे असेल. कारण  क्रेटामध्ये सध्या 17 इंचाची अ‍ॅलोय व्हील उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने ही कार क्रेटाच्या धर्तीवर तयार केली असल्याचे समजते आहे. फक्त आकार आणि अजून काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या या ह्युंडाई  7 सीटर एसयूव्ही अल्काझरल ही क्रेटा सारखीच आहे.

कंपनी राजस्थानमध्ये 6 एप्रिल रोजी या एसयूव्हीची (SUV) जागतिक पातळीवर लाँचिंग करणार आहे, तर जूनमध्ये ही कार बाजारात विक्रीसाठी आणली जाऊ शकते. ह्युंदाई कंपनीने मागील वर्षी क्रेटाला (Creta) अद्ययावत केले होते तेव्हापासून क्रेटाने विक्रीच्या बाबतीत आपल्या विभागातील प्रत्येक कारला मागे पडले आहे.  ह्युंदाई अल्काझारमध्ये, आपल्याला ब्लूलिंक कनेक्टिव्हिटीसह व्हॉईस रेकग्निशन व्यतिरिक्त, एंड्रॉइड ऑटो आणि ऍप्पल कार प्लेसह कनेक्टिव्हिटीसह 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे. त्यामुळे या कारला भारतीय बाजारात कसा प्रतिसाद मिळतो हे आता पहावे लागणार आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com