‘’मला आमदार असल्याची लाज वाटत आहे’’ मुख्यमंत्री केजरीवाल यांना घरचा आहेर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

सरकार मदत करु शकत नाही.

देशात कोरोना संसर्गाचा (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना दिवसेंदिवस भयावह रप धारण करत आहे. त्यातच दिल्लीच्या अनेक रुग्णायलामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा (Oxygen) अपुरा साठा असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (Delhi High Court) यासंबधीची सुनावणी देखील सध्या सुरु आहे. मात्र या सगळ्यामध्ये दिल्लीमधल्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडत नसल्याचे आरोप केले जात आहेत. यासंदर्भात दिल्ली सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना दिल्लीमध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी घरचा आहेर दिला आहे. दिल्लीमधील मटीया महल विधानसभा मतदारसंघातील अमदार शोएब इकबाल (Shoaib Iqbal)   यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजपसह कॉंग्रेंसच्या सोशल मिडियावरील ट्विटर हॅन्डलवरुन इकबाल यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इकबाल एकदम भावूक होतना दिसत आहेत. त्यांनी या व्हिडिओत दिल्लीतील कोरोनामुळे निर्माण झालेली विदारक स्थिती विषद केली आहे. (I am ashamed to be an MLA said Chief Minister Kejriwal)

’राजकीय पुढाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली’’ मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर...

शोएब मलिक यांनी व्हिडिओमध्ये दिल्लीमधील कोरोनाच्या विदारक परिस्थितीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‘’आज मला दिल्लीमधील परिस्थिती पाहून रडू येत आहे. रात्रभर मला झोप लागत नाही. दिल्लीत लोकांना ऑक्सिजनचा सिलेंडर मिळत नाही, औषधं मिळत नाहीत. माझा एक जवळचा मित्र दिल्लीतील न्यू लाईफ रुग्णालयामध्ये तडफडत आहे. त्याच्याजवळ ना ऑक्सिजन आहे ना व्हेंटिलिटर नाहीत. रात्रीपासून माझ्याकडे औषधांच्य़ा चिठ्ठ्या येत आहेत. रेमडिसिव्हीर आणून देऊ? देव करो आणि त्याचं काही बरं न होवो. ऑक्सिजन मिळत नाही,’’ असं आमदार शोएब इकबाल या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

आमदार शोएब इकबाल यांनी या व्हिडिओमध्ये आपली नाराजी दिल्ली सरकारवर व्यक्त केली आहे. मला आज आमदार असल्याची लाज वाटत आहे. आम्ही कुणाच्या गरजेला पडत नाही. सरकार मदत करु शकत नाही. मी स्वत: सहा वेळा आमदार आहे. दिल्लीमध्ये सगळ्यात जेष्ठ आमदार आहे. त्यानंतरही कुणी ऐकत नाही. कोणाला संपर्क करायचा? इथ कोण नोडल अधिकारी आहे हे बिलकुल कळत नाही. त्यामुळे दिल्ली न्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावावी. दिल्लीमध्ये फार भयावह परिस्थिती आहे. असं नाही झालं तर दिल्लीच्या रस्त्यांवर कोरोना रुग्णांची प्रेत दिसू लागतील,’’ असं इकबाल यांनी म्हटलं आहे.

'लसींच्या किंमतीवरून' सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला फटकारलं

दरम्यान, इकबाल यांच्या व्हिडिओनंतर भाजप आणि कॉंग्रेसकडून केजरीवाल सरकारवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. गोवा कॉंग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मिडियावरील ट्विटर हॅंन्डलवरुन हा व्हिडिओ ट्विट करत दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच दिल्लीतील भाजप आमदार अजय महावार यांनी देखील ट्विटरवरुन केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी एक नवा मुद्दा भेटला आहे.

 

 

संबंधित बातम्या