'I Am Sorry...' : CJI NV रमणा यांनी शेवटच्या दिवशी सांगितली ही गोष्ट

Chief Justice NV Ramana: सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे.
CJI NV Ramana
CJI NV RamanaDainik Gomanta

Chief Justice NV Ramana: सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सेरेमोनिअल बेंचसमोरील प्रकरणांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी त्यांच्या कार्यकाळात तात्काळ सुनावणीसाठी खटले सूचीबद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करु न शकल्याबद्दल शेवटच्या औपचारिक खंडपीठात माफी मागितली. सरन्यायाधीश म्हणाले की, 'मला माफ करा, सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरु राहावे.'

तत्पूर्वी, सरन्यायाधीश एन व्ही रमणा (CJI NV Ramana) यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी ही एक अदृश्य शक्ती आहे, जी संस्थेला न्याय देण्यासाठी मदत करते.' न्यायमूर्ती रमणा यांनी कोविड-19 महामारीच्या उद्रेकादरम्यान सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालय एकही दिवस सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवू शकले.

CJI NV Ramana
एकत्र राहणाऱ्या स्त्री-पुरुषाचे नाते लग्नासारखेच - सर्वोच्च न्यायालय

दरम्यान, सुप्रीम कोर्ट एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना न्यायमूर्ती रमण म्हणाले की, 'गेल्या 16 महिन्यांपासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून आणि आठ वर्षे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा माझा अनुभव अतिशय अद्भुत आहे.'

CJI NV Ramana
जीएसटी परिषदेच्या शिफारसींसाठी सरकार बांधील नाही - सर्वोच्च न्यायालय

दुसरीकडे, सरन्यायाधीशांनी असेही सांगितले की, 'एका वेळी सर्वोच्च न्यायालयातील 500 कर्मचाऱ्यांना एका दिवसात कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळले होते. भयावह परिस्थिती होती. मात्र तुम्ही सर्वांनी महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम केले. तुम्ही न्यायालयाचे कामकाज एक दिवसाची सुट्टी न घेता सुरु ठेवण्याची खात्री दिली. ते तुमच्या संस्थेप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे. मी तुम्हा सर्वांना नमन करतो.' न्यायमूर्ती रमणा पुढे म्हणाले की, 'मी माझ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या न्याय्य समस्यांचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com