इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र नव्हे.. ‘मोदी मतदान यंत्र’

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणूक प्रचारात बोलत असताना त्यांनी मोदी व इव्हीएम यंत्राची तुलना केली.

अरारिया :  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणूक प्रचारात बोलत असताना त्यांनी मोदी व इव्हीएम यंत्राची तुलना केली.  ‘‘एमव्हीएम असो वा मोदीजींचा मीडिया मी त्याला घाबरत नाही. सत्य हे सत्य आहे, न्याय हा न्याय आहे. या माणसाविरोधात मी विचारसरणीचे युद्ध खेळत आहे. त्यांच्या विचारांविरोधात आमचा लढा आहे. आम्ही त्यांच्या विचारांचा पराजय करू,’’ असे ते म्हणाले.  राहुल गांधी यांनी कोणत्याही घटनेचा उल्लेख न करता ‘‘नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सभांमधून माझ्याविषयी कटू गोष्टी कथन केल्या. ते द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मी प्रेमाची पखरण करीत आहे. 

संबंधित बातम्या