मी सीआरपीएफचा आदर करते, पण भाजपच्या सीआरपीएफचा नाही: ममता बॅनर्जी

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दोन भाग केले आहेत.

देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी या 5 राज्यांच्या निवडणुकांच वारं घुमत आहे. त्यापैकी महत्वाची समजली जाणारी पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) च्या ममता बॅनर्जी यांच्यामध्ये रंगत आहे. संपूर्ण केंद्रीय यंत्रणा बंगालमध्ये तळ ठोकून आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 जागेंसाठी एकूण 8 टप्यामध्ये निवडणुका होत आहेत, त्यापैकी 3 टप्यातील निवडणूका पार पडल्या आहेत. येत्या 2 मे रोजी मतमोजणी होणून उमेदवारांच भवितव्य ठरणार आहे. 

कमांडो राकेश्वर सिंग यांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर; जम्मू-अखनूर हायवेवर...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी कूचबिहार येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दोन भाग केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपण सीआरपीएफचा आदर करतात असल्याचे म्हणत, परंतू भाजपाच्या सीआरपीएफचा बिलकूलच आदर करत नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असल्याचे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तसेच आपण अशा सीआरपीएफला बद्दल बोलत आहे, जे खरे जवान आहेत. त्यामुळे भाजपच्या सीआरपीएफचा आदर करत नसल्याची टीका त्यंनी केली आहे. यानंतर पुढे त्या म्हणाल्या की,"भाजपाचे सीआरपाएफ जवान महिलांना मारहाण करताता,ते गडबड करतात, महिलांवर हल्ला करतात, लोकांना त्रास देत आहेत.''(I respect the CRPF, but not the BJP's CRPF:Mamata Banerjee)

 

याशिवाय ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले असल्याचे सांगत, भाजपावर तूफान टीका केली. तर दुसरीकडे भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम जागेवर विजय मिळविण्याचा दावा केला आहे, मात्र टीएमसीने सीआरपीएफवर आरोप करताना मतदारांना बंगालमधील मतदान केंद्रामध्ये  जाण्यापासून रोखले असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर, ममता बॅनर्जीं यांचा राग आणि संतापावरुन असं दिसत आहे त्या निवडणूक हरल्या आहेत असं भाजपने म्हटले आहे. 

संबंधित बातम्या