माझी 'अल्लाह'शी भेट होणार..असं म्हणत तरुणीने केली आत्महत्या

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

‘’मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्य़ावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला एवढचं आयुष्य़ दिलं होतं असं समजा,’’

अहमदाबाद : अहमदाबादमधील 23 वर्षीय तरुणीने साबरमती नदीत उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आयशा आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी फोनवरुन एक व्हिडीओ शूट केला. आयशा या व्हिडिओत भावूक झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आयुष्य़ संपवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी इतर कोणीही जबाबदार नाही. आयशाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्य़ानंतर खळबळ माजली.

आयशाचा मृतदेह पोलिसांना सापडला त्यानंतर तिच्या पतीविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आयशाच्या वडिलांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, ‘’आयशाचा विवाह 2018 मध्ये राजस्थानमधील आरिफ खान याच्यासोबत झाला होता. परंतु विवाहानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्या मंडळींनी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. मी त्यांना काही पैसे दिलेही होते. मात्र त्यांच्या मागण्या काही संपतच नव्हत्या. काही दिवसांनी आरिफने आयशाला भांडण झाल्यानंतर घरी पाठवले होते. आयशा घरी आल्यानंतर आऱिफने तिच्याशी बोलनेही बंद केले होते. या वेदना सहन होत नसल्य़ामुळेच तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

आयशाने शूट केलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडीओत तिच्या चेहऱ्य़ावरील हास्य़ भावूक करणारे होते. या व्हिडीओमध्ये आयशा आपली ओळख देताना आपले दु:ख बोलून दाखवत आहे. ‘’मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्य़ावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला एवढचं आयुष्य़ दिलं होतं असं समजा,’’ असं आयशा सांगण्य़ाचा प्रयत्न करत आहे.

''पप्पा अजून किती दिवस तुम्ही लढणार आहात. केस मागे घ्या..आयशा लढण्यासाठी नाही . मी आरिफवर प्रेम करते.. तर मी त्याला त्रास का देईन? जर त्याला स्वातंत्र्य हंव असल्यास त्याला मी मोकळं केलं पाहिजे. असंही माझं आयुष्य इंथच संपत आहे. आल्लाहाशी माझी भेट होणार याचा मला आनंद आहे. माझी चूक कुठे झाली हे मी अल्लाहला भेटल्यानंतर विचारेन. माझ्यामध्ये काय दोष आहे?’’ असं बोलताना या व्हिडीओमध्ये आयशा दिसत आहे.

शेवटी आयशा म्हणते, ‘’ही सुंदर नदी मला सामावून घेईलं अशी तिला प्रार्थना करते. मी वाऱ्यासारखे आहे, मला सतत वाहायचं आहे.’’

 

संबंधित बातम्या