नंदीग्राममधून मी जिंकणारच; ममता बॅनर्जीचा नरेंद्र मोदींवर पलटवार

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांनी जोर धरला आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांनी जोर धरला आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकेच नव्हे तर, नंदीग्राममधून मी जिंकणारच, असा विश्वासही यावेळी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगाल मधील कूचबिहारमध्ये आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. 

भाजप उमेदवाराच्या वाहनात सापडले ईव्हीएम; तीन अधिकारी निलंबित

यावेळी भाजपाला  उद्देशून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढायची हे सांगायला मी तुमच्या पक्षाची सदस्य नाही. मी नंदीग्राममधून निवडणूक लढणार आणि बहुमतांनी विजयीदेखील होणार, असा विश्वास यावेळी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.  मात्र मी एकटीने जिंकून उपयोग नाही माझ्यासोबत तृणमूल पक्षाच्या आणखी 200 उमेदवारांनी जिंकणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जेणेकरून यांचा पक्ष सत्ता स्थापन करू शकेल. म्हणून टीएमसीच्या उमेदवारांना मतदान करा,'' असे आवाहनही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केले.

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण 

याचशिवाय दिन्हाटा येथीलएका मोर्चात ममता यांनी पंतप्रधान मोदींना गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. मला मंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायच आहे की, आधी आपल्या गृहमंत्र्यांवर नियंत्रण ठेवा मग यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या हावडा येथील प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारल्याचे दिसत आहे. दीदीकडे अद्याप शेवटच्या टप्प्यातील उमेदवारीसाठी वेळ आहे. अचानक तुम्ही दुसर्‍या एखाद्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या अफवामध्ये किती सत्य आहे ते सांगा. असा खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. 

संबंधित बातम्या