मनी लाँड्रिंग प्रकरणात आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना अटक

झारखंडमध्ये तैनात असलेल्या IAS पूजा सिंघल यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना अटक
IAS Pooja SinghalDainik Gomantak

झारखंडमध्ये तैनात असलेल्या IAS पूजा सिंघल यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. पूजा सिंघल या झारखंडच्या खणन सचिव आहेत. खुंटी येथील मनरेगा योजनेतील पैशाच्या कथित गैरव्यवहारासंबंधी त्या मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या होत्या. ईडीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. 2000 बॅचचे आयएएस अधिकारी सिंघल यांना ईडीने अनेक प्रश्न विचारले होते. 6 मे रोजी, ईडीने झारखंडसह इतर काही ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सिंघल आणि त्यांचे व्यावसायिक पती अभिषेक झा यांची चौकशी केली होती.

IAS Pooja Singhal
'ओपनिंग सुरु', गुजरात काँग्रेसला निवडणूक रणनीतीकाराची गरज

दरम्यान, पूजा यांचे पती अभिषेक यांनाही अटक करण्यात आली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही अभिषेक यांची चौकशी करण्यात आली. पती-पत्नी, दोघांची आज समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने अभिषेक यांच्या पल्स हॉस्पिटलवरही छापा टाकला. पल्स हॉस्पिटलमध्ये (Hospital) गुंतवणूक कुठून आली असा प्रश्न अभिषेक झा यांना विचारण्यात आला. त्यांच्या पत्नी पूजा सिंघल यांचाही या रुग्णालयाच्या उभारणीत हातभार आहे का? अभिषेक झा यांना विचारले जात आहे की, हॉस्पिटलमध्ये 123 कोटींहून अधिक गुंतवणूक (Investment) झाली असताना, कर्ज केवळ 23 कोटीच कसे दाखवले? बाकीचे पैसे आले कुठून? पूजा सिंघल यांची यात काही भूमिका आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत ईडीला मिळू शकलेली नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.