ICAI Result: भाऊ-बहीण जोडी सीएच्या फायनलमध्ये उत्तीर्ण

नंदिनी अग्रवालने ऑल इंडिया रँक मध्ये 1ला क्रमांक प्राप्त केला, तर भाऊ सचिनला टॉप 20 मध्ये स्थान मिळाले
ICAI Result: भाऊ-बहीण जोडी सीएच्या फायनलमध्ये उत्तीर्ण
सीएच्या फायनलमध्ये उत्तीर्ण झालेली भाऊ-बहीण जोडी नंदिता व सचिन अग्रवाल (ICAI Result) दैनिक गोमन्तक

ICAI Result: मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील (Morena District MP) 19 वर्षीय नंदिनी अग्रवाल (Nandita Agrawal) 800 पैकी 614 गुणांसह अव्वल आली. तर तिचा 21 वर्षांचा भाऊ, सचिन अग्रवालने (Sachin Agrawal) ऑल इंडिया रँक (AIR) 18 प्राप्त केले आहे. ICAI चा आज CA चा फायनल अँड फाउंडेशन (जुलै) 2021 चा निकाल जाहीर केला. सनदी लेखापाल अंतिम परीक्षा (नवीन अभ्यासक्रम) साठी 83,606 उमेदवारांनी नोंदणी केली होती. मोरेना जिल्ह्यातील व्हिक्टर कॉन्व्हेंट शाळेचे विद्यार्थी, सचिन आणि नंदिनी यांनी 2017 मध्ये 12 वी उत्तीर्ण केली. नंदिनीने लहानपणापासूनच पहिले दोन वर्ग सोडून थेट तिच्या मोठ्या भावाबरोबर एकाच वर्गात होती.

सीएच्या फायनलमध्ये उत्तीर्ण झालेली भाऊ-बहीण जोडी नंदिता व सचिन अग्रवाल (ICAI Result)
अजबच! आदीवासी मुलांची अनोखी शक्कल; वांग्याच्या झाडापासून टोमॅटोचे उत्पादन

ती म्हणाली, “माझा भाऊ आणि मी शाळेपासून एकत्र शिकत आहोत. आम्ही आयपीसीसी आणि सीए फायनलसाठी एकत्र तयारी केली. आमची रणनीती सोपी आहे. आम्ही एकमेकांना अभ्यासात मदत करतोच परंतु अभ्यासाच्या बाबतीत पटत नसेल तर आम्ही आणखी टीकाही करतो. जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडवतो तेव्हा तो माझी उत्तरे तपासतो आणि त्याच्या उत्तरपत्रिकेची तपासणी मी करते, असे काही क्षण आलेत जेव्हा मी माझी आशा गमावत होते, पण माझ्या भावाच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा ट्रॅकवर आले."

सीएच्या फायनलमध्ये उत्तीर्ण झालेली भाऊ-बहीण जोडी नंदिता व सचिन अग्रवाल (ICAI Result)
"जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात ...": अमित शाह

नंदिनी सध्या पीडब्ल्यूसीमधून लेखमाला घेत आहे. तिला IPCC परीक्षेत AIR 31 देखील मिळाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही दोघा भावंडांचे अभिनंदन केले आहे. गोयल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com