ICMR चे PM मोदींना पत्र; 18 वर्षावरील लोकांना कोरोनाची लस द्या

ICMR चे PM मोदींना पत्र; 18 वर्षावरील लोकांना कोरोनाची लस द्या
ICMRs letter to PM Modi Give corona vaccine to people over 18 years of age

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच इंडियन मेडिकल असोशिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाटवून चिंता व्यक्त केली आहे. एवढच नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील 18 वर्षावरील सर्व लोकांना तातडीने लस देण्यात यावी अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे. या पत्रामध्ये असोसिएशनने सहा महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. आणि त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुध्दचा लढा सुरु असतानाच देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं सांगताना अत्यंत खेद होत आहे. तसेच पुढे देशामध्ये सध्या 7 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याचंही असोसिएशनने म्हटलं आहे. देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर 4 एप्रिल 2021 रोजी पहिल्यांदा एक लाखाहून कोरोनाबाधित रुग्ण 24 तासामध्ये आढळून आले होते. कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ असल्याचं सांगितलं जात आहे. असंही कोरोना परिस्थिबद्दल चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या असणाऱ्या संस्थेनं म्हटलं आहे. (ICMRs letter to PM Modi Give corona vaccine to people over 18 years of age)

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association)  साडेतीन लाख सदस्य भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेच्या पाठीशी असल्याचं पत्रामध्ये म्हटलं आहे. लसीकरण मोहीमेमध्ये पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दे आणि सर्वसामान्यांचं लसीकरण सुरु झालं आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करुन त्यांच्य़ावर उपचार करण्यासंदर्भात ज्या सूचना केल्या आहेत त्याप्रमाणे काम सुरु आहे. मात्र मोठ्याप्रामणात लोक मास्क न घालता एकाच ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत, कोरोना संदर्भातील नियम पाळताना दिसत नाहीत, कोरोना विषाणूमध्ये सतत बदल होत असल्याकारणाने आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत निष्फळ जात आहे. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे असोसिएशनने म्हटलं आहे.

सध्या कोरोना नियम न पाळणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करणे, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि बेड्सची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करुन देणे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणे त्याचबरोबर नियमानुसार संपूर्ण उपचार करुन घेणे या गोष्टींवर सध्याच्या काळामध्ये लक्ष देणं गरजेचं बनलं आहे, असही असोसिएशनने आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com