Punjab Assembly Election Result 2022 : अच्छे दिन येणार केजरीवाल यांच्या वाट्याला

पंजाबमध्ये सत्ता आल्यास राज्यसभेत वाढणार आपचे 7 खासदार
Arvind kejarival
Arvind kejarivaldainik gomantak

Punjab Assembly Election Result 2022 : अच्छे दिन हे पंतप्रधान मोदी यांचे वाक्य असून ते आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला लागू पडताना दिसत आहे. आधीच दिल्लीत सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाला आता पंजाबमध्ये रेड कार्पेट मिळण्याची शक्यता आहे. सध्या पंजाबमध्ये आपची जवळपास 90 जागांवर आघाडी असून तेथे सत्ता आल्यास राज्यसभेत आम आदमी पार्टीला मोठा फायदा होऊ शकतो. येथे विजय मिळाल्यास आम आदमी पार्टीचे राज्यसभेत 7 खासदार वाढण्यास मदत होणार आहे. (If Aam Aadmi Party comes to power in Punjab, 7 MPs will be added in Rajya Sabha)

सध्या आपचे राज्यसभेत 3 खासदार आहेत. आणि पंजाबमधील विजयामुळे आखणी 7 खासदार वाढतील. असे राज्यसभेतील त्यांच्या खासदारांची संख्या 10 होईल. दरम्यान, पंजाबमधील 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा 9 एप्रिल रोजी संपत आहे. या पाच जागांवर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मार्चअखेर निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राज्यसभेच्या खासदाराच्या जागेसाठी 18 ते 20 आमदारांचे मत आवश्यक आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या चार राज्यसभेतील खासदारांचा विजय होऊ शकतो. तसेच जुलैमध्ये आणखीन दोन जागांसाठी निवडणूक होईल. त्याही जागा आम आदमी पार्टी आरामात जिंकू शकते. अशाप्रकारे आम आदमी पार्टी जुलैअखेर फक्त पंजाबमधून (Panjab) राज्यसभेच्या 7 जागा जिंकू शकते.

Arvind kejarival
UP Election 2022 Result LIVE: योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून 40,144 मतांनी आघाडीवर

या जागेसाठी आपला उतरावे लागणार मैदानात

सध्याचे 3 खासदार आणि पंजाबमध्ये वाढणारे 7 असे 10 खासदार आपचे होतील. मात्र आम आदमी पार्टीचे (AAP) नेते भगवंत मान हे संगरूर लोकसभेचे खासदार आहेत. तसेच ते मुख्यमंत्री (CM) पदाचे दावेदार ही आहेत. जर जर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर या जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आम आदमी पार्टीला संगरूर लोकसभेच्या (parliament) जागेवर पोटनिवडणुकीसाठी उतरावे लागणार आहे. पण येथील सर्व विधानसभा या आपच्याच असल्याने विजयात कोणताही अडथळा नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com