Ashok Gehlot काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास राजस्थानची कमान कोणाकडे? मिळाले हे उत्तर

Ashok Gehlot Sonia Gandhi Meeting: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotDainik Gomantak

Ashok Gehlot Sonia Gandhi Meeting: : राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडणार असून, पक्षाने सांगितल्यास काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेहलोत आज दिल्लीत पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

दुसरीकडे, सर्वात मोठी बातमी म्हणजे गेहलोत काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष झाल्यास राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी राहतील की नाही? याबाबत अद्याप सस्पेंस आहे. गेहलोत यांच्या भूमिकेवरुन असे दिसते की, त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायचे नाही. त्यांना एक व्यक्ती, एक पद यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणीही उभे राहू शकते, मग तो मंत्री असो किंवा मुख्यमंत्री.' अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यास सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानची कमान सोपवली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Ashok Gehlot
'काँग्रेस अध्यक्ष पद कुणा एकाचा दैवी अधिकार नाही', राहुल गांधीं पुन्हा प्रशांत किशोरांच्या टार्गेटवर

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती दावेदार

अशोक गेहलोत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राहुल गांधी - निवडणूक लढवण्याबाबत साशंकता

शशी थरुर - अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली.

अशोक गेहलोत यांची राजकीय कारकिर्द

राजस्थानचे तीन वेळा मुख्यमंत्री

गांधी घराण्याचे निकवर्तीय

पक्षाचा मोठा ओबीसी चेहरा

केंद्र आणि संस्थेचा 40 वर्षांचा अनुभव

हिंदी पट्ट्यात पक्षाला ताकद देऊ शकतो

Ashok Gehlot
"तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष होणार का...?" राहुल गांधींनी स्पष्टच सांगितले

'राहुलची समजूत घालण्याचा मी शेवटचा प्रयत्न करेन'

दिल्लीत (Delhi) पोहोचलेल्या गेहलोत यांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी राजी करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींशी बोलूनच पुढे काय करायचे ते ठरवू, असेही ते म्हणाले आहेत. गेहलोत पुढे म्हणाले, 'मला काँग्रेसची सेवा करायची आहे. जिथे पक्षाला माझी गरज वाटेल, तिथे मी तयार आहे. पक्षाला माझी मुख्यमंत्री किंवा अध्यक्ष म्हणून गरज वाटत असेल तर मी नाकारु शकणार नाही.'

'मी कोणत्याही पदावर राहणार नाही'

गेहलोत पुढे म्हणाले, 'मी पक्षाचे काम करण्यास सदैव तयार आहे. वेळ आली तर कोणतेही पद भूषवणार नाही. मला राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) रस्त्यावर उतरु द्या. आज जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत काँग्रेसने मजबूत असणे गरजेचे आहे. जिथे-जिथे काँग्रेस मजबूत करण्याची गरज असेल तिथे मी उभा राहीन.'

Ashok Gehlot
काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; 21 ऑगस्टपासून Congress अध्यक्षपदाची निवडणूक

निवडणुकीचे वेळापत्रक

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार असून, 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com