पहिल्या लसीनंतर कोरोना झाल्यास तीन महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा 

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोरोना लस सुरक्षित असून, गर्भवती महिलांसाठी लस देण्याचा विचार देखील करण्यात येत आहे.

नवी दिल्ली :  कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेऊनही कोरोनाची (Covid-19) लागण झाल्यास, त्यातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा दुसरा डोस घेणे योग्य आहे. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोरोना लस (vaccination)  सुरक्षित असून, गर्भवती महिलांसाठी लस देण्याचा विचार देखील करण्यात येत आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. (If corona occurs after the first vaccine, a second dose should be taken three months later)  

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर कोणाला कोरोना झाला तर त्याने दुसरा डोस तीन महिन्यानंतर घ्यावा. ज्या रुग्णांना प्लाझ्मा (Plasma) देण्यात आला आहे, अशा रुग्णांनी देखील  रुग्णालयातून बरे होऊन घरी गेल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी. असे  द नेशनल एक्‍सपर्ट ग्रुप ऑन वैक्‍सीन एडमिनिस्‍ट्रेन फॉर कोविड-19 (NEGVAC) यांच्याकडून करण्यात आलेल्या नवीन शिफारसीमध्ये हे सांगण्यात आले आहे.

कोरोना व्यतिरीक्त इतर गंभीर आजारावर आयसीयूत (ICU) उपचार घेणाऱ्या रुग्णांनी 4 ते 8 आठवड्यानंतर लस घ्यावी. कोरोनाची लस घेतल्याच्या 14 दिवसानंतर रक्तदान करावे अशी माहिती NEGVAC कडून देण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या