'लसीकरणाचे उद्दिष्ठ पूर्ण करा नाही तर फासावर लटकवेन' जिल्हाधिकाऱ्यांची जीभ घसरली

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मोहीम राबवून लोकांचे लसीकरण (Vaccination) केले जात आहे. याबाबत ग्वाल्हेरचे (Gwalior) जिल्हा दंडाधिकारी चर्चेत आले आहेत.
Kaushalendra Vikram Singh

Kaushalendra Vikram Singh

Dainik Gomantak 

ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे देशभरातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांनी अधिकाऱ्यांना लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याच क्रमाने मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मोहीम राबवून लोकांचे लसीकरण (Vaccination) केले जात आहे. याबाबत ग्वाल्हेरचे (Gwalior) जिल्हा दंडाधिकारी चर्चेत आले आहेत.

दरम्यान, मंगळवारी जिल्हा दंडाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह (Kaushalendra Vikram Singh) यांनी बैठकीदरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. त्यांनी यावेळी म्हटले की, 'एक जरी माणूस लसीकरणाविना सोडला तर मी त्याला फाशी देईन. तुम्ही शेतात जा, माणसाचे पाय धरा किंवा त्याच्या घरी जाऊन 24 तास बसा, पण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे,'.

<div class="paragraphs"><p>Kaushalendra Vikram Singh</p></div>
"मोदी जी, फिर से माफी मांगने का टाइम आया है …" राहुल गांधींचे टीकास्त्र

मिळालेल्या माहितीनुसार, भितरवार तहसीलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये आकडे सादर केले होते. त्यानुसार कोविड-19 लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद देत एकही व्यक्ती राहिली तर त्याला फाशी देईन, असे म्हटले. त्यांच्या इशाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुसरीकडे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएम म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना या प्रकरणाचे गांभीर्य समजत नाही, त्यामुळे इशारा देण्यात आला आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास बडतर्फ व निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com