'' जर लसीचं नसतील तर आम्ही फाशी घ्यायची का?'' केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

उद्या न्यायालयाने म्हटले तुम्हाला जास्त लस द्यावी लागेल आणि ती मिळाली नाही तर आम्ही स्वत:ला फासावर लटकवावे का?’’

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. लसीकरण हाच आता कोरोना महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठीचा पर्याय असल्याचे दिसत आहे. पण देशात कोरोना लसींचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आलं आहे. देशातील अनेक राज्यांना लसीसाठी केंद्र सरकारकडे विनंती करावी लागत आहे. यातच आता कर्नाटकामध्ये (Karnataka) लसींचा तुटवडा भासू लागला आहे. यावर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा (Sadananda Gowda) यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोना लसींचे वितरण करण्यास अपयशी ठरल्यामुळे सरकारमधील लोकांना फाशी घ्यावी का असा सवाल केला आहे. (If there is no vaccine should we hang ourselves Asked the Union Minister)

‘’न्यायालयाने चांगल्या हेतूने म्हटले की, देशातील प्रत्येकाचे लसीकरण करायला हवं. जर उद्या न्यायालयाने म्हटले तुम्हाला जास्त लस द्यावी लागेल आणि ती मिळाली नाही तर आम्ही स्वत:ला फासावर लटकवावे का?’’ असा प्रश्न गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

''गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा'.

देशात लसींच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या तुटवड्याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गौडा यांनी केंद्राच्या कृतीकार्यक्रामबाबत पत्रकारांना माहिती दिली. कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे निर्णय घेतले जात नसल्याचे गौडा यांनी सांगितले.  

''सरकार आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत आहे, मात्र काही काही उणीवा समोर आल्या आहेत. व्यवहारिकदृष्ट्या काही गोष्टी काही गोष्टी ज्या आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्या आपण व्यवस्थापित करु शकतो का हे पाहू असे,’’ असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. एक किंवा दोन दिवसांत गोष्टी सुधारतील आणि लोकांचे लसीकरण करता यावे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

कोविड -19 लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा? संसर्ग झाल्यास काय करावं? काय आहेत...

कर्नाटकात कोरोनाचे रोज 40 ते 50 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. यासोबत लसीकरण वाढवण्याची मागणी सुध्दा वाढत आहे. राज्यसरकारने राज्यांच्या अहवालानुसार तीन कोटी लसी खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. मात्र राज्याला 7 लाख लसीच्या मात्रा पोहचल्या आहेत.

संबंधित बातम्या