''तृणमुल कॉंग्रेस सत्तेत आल्यास पश्चिम बंगालचे काश्मीर होईल''

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

श्यामाप्रसाद मुखर्जी नसते तर भारत देश इस्लामीक देश बनला असता.

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय वातावरण चांगलच तापलं आहे. तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुवेन्दु अधिकारी यांना उमेदवारी देण्यात आली. ''तृणमुल कॉंग्रेस पश्चिम बंगालला दुसऱ्या काश्मीरमध्ये बदलण्यास उत्सुक आहे,'' असं म्हणत सुवेन्दु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

भाजप नेते तृणमुल कॉंग्रेसच्या विरोधात काही ना काही बोलतच असतात. अधिकारी यांची ओळख पश्चिम बंगालच्य़ा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खास मर्जीतील म्हणून राहिलेली आहे. मात्र त्यांनी तृणमुल पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचा हात धरला. आणि विशेष म्हणजे या निवडणूकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे.

West Bengal Election:  ममता बॅनर्जीं विरुध्द सुवेंदू अधिकारी

काल मुहळपारा, बहाला येथील एका सभेत बोलताना सुवेन्दु अधिकारी म्हणाले, ‘’श्यामाप्रसाद मुखर्जी नसते तर भारत देश इस्लामीक देश बनला असता आणि पुन्हा एकदा तृणमुल कॉंग्रेस सत्तेत आले तर पश्चिम बंगालचे काश्मीर होईल.’’

काही दिवसांपूर्वी 14 फेब्रुवारीला पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेसवर पश्चिम बंगालचे बांग्लादेशात बदलण्याचा प्रयत्न केल्य़ाचा आरोप केला होता.

 

 

संबंधित बातम्या