नखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास तुम्हाला कोरोना संसर्ग होऊन गेला असं समजा

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

कोरोनाचा विषाणू जसा स्वरुप बदलतो त्याप्रमाणे या संसर्गाची लक्षणंही सातत्याने बदलत आहेत.

देशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील दीड वर्षात कोरोनाची अनेक नवनवीन लक्षणे आढळून आली आहेत. दर काही दिवसांनी लगेच कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे सुध्दा दिसून आले आहे. कोरोनाचा विषाणू (Virus) जसा स्वरुप बदलतो त्याप्रमाणे या संसर्गाची लक्षणंही सातत्याने बदलत आहेत. दरम्यान नवी लक्षणे दिसल्यास घाबरुन जाण्याऐवजी योग्यवेळी डॉक्टरांकडून (Doctor) उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. या आगोदर केवळ घसा, फुफ्फुस, नाक, जीभ या अवयवांवर दिसणारा परिणाम आता मानवाच्या नखांवरही दिसू लागला आहे. अनेकदा आपण आपल्या नखांकडे (Nails) लक्ष देत नाही. परंतु आता त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण  कोरोना झाला किंवा नाही याचा अंदाज आता नखांवरुनही लावला जात आहे. तसेच काही रुग्णांच्या नखांवरही त्याचा परिणाम झाला असल्याचे दिसून आला आहे. यासंदर्भात जाणून घेऊया.. 

नेमका नखांमध्ये काय होतो बदल?
कोरोनाच्या संसर्गामधून ठीक झाल्यानंतर रुग्णांच्या नखांमध्ये अचानक बदल झालेले पाहायला मिळत आहे. लाल चंद्रकोर आकार नखांमध्ये  तयार होतो. आणि बराच काळ नखे तशीच राहतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशी लक्षणे आता कोरोना रुग्णांमध्ये दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी अशी लक्षणे यापूर्वी कधीही पहायला मिळाली नाहीत. त्यामुळे या दुर्लक्ष करुन चालणार नाही.

Coronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम!
 

नखांवर कोणती लक्षणे दिसतात
जेव्हा एखाद्याला कोरोनाचा संसर्ग होतो तेव्हा त्याचा गंभीर परिणाम रक्तवाहिन्यांवरही होतो. तसेच  अनेक वेळा जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीरामध्ये संक्रमणास विरोध करते तेव्हा मात्र रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे नखांवर लाल डाग दिसतात आणि काही नखांवर त्याचा परिणामही दिसून येतो.  नखांवर ही लक्षणे चार आठवड्यांपर्यंत राहू शकतात. सामान्यत:हा कोरोनातून बरे  झालेल्यांमध्ये हे बदल दिसून आल्यास डॉक्टरांच्या मतानुसार हे बदल कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची लक्षणे दर्शवतात.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पालक कोरोना पॉझिटिव्ह आल्यास मिळणार 15 दिवसांची रजा

नखे नाजूक होतात
कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये नखांची लक्षणे दिसून आलेल्या लोकांमध्ये असेही आढळले की नखे कमकुवत होतात. कोरोनातून ठीक झाल्यानंतरही या आजारामुळे नखे नाजूक झाल्याने ती तुटण्याची शक्यताही असते. त्यामुळे जर नखांची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नखांच्या रंगामध्ये तणावामुळे होतो बदल
नखांवर चार आठवड्यानंतर निर्माण झालेले अर्धवर्तुळ दिसत नाही. मात्र त्यानंतर नखांचा रंग बदलण्याची शक्यता वाढते. नखांच्या रंगामध्ये बदल होण्यामागे मुख्य कारण म्हणजे रक्तपेशींवर निर्माण झालेला ताण. कोरोना संक्रमणादरम्यान किंवा त्यानंतरही काही प्रमाणात हा ताण कायम राहतो. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर नखांचा रंग हळूहळू पूर्वव्रत होतो.

 

संबंधित बातम्या