‘’लढायचं असेल तर पाकिस्तान आणि चीनशी लढा’’ या कॉंग्रेस नेत्याचा मोदी सरकारवर हल्लाबोल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

संसदेच्या  दोन्ही  सभागृहात  विरोधकांनी  मोदी सरकारला  शेतकरी  आंदोलनावरुन  घेरण्यास  सुरुवात  केली  आहे.

नवी दिल्ली:  गेल्या  दोन  महिंन्यापासून  दिल्लीच्या  सीमेवर  केंद्र  सरकारने  बनवलेल्या कृषी  कायद्यांच्या  विरोधात शेतकरी  अंदोलन  करत  आहेत. केंद्रसरकार आणि  शेतकरी  नेते  यांच्यात  अनेक  चर्चेच्या  पार  पडल्या  मात्र  कृषी  कायद्यावर  अद्याप  कोणत्याही प्रकारचा  तोडगा  निघू  शकलेला नाही. संसदेच्या  दोन्ही  सभागृहात  विरोधकांनी  मोदी सरकारला  शेतकरी  आंदोलनावरुन  घेरण्यास  सुरुवात  केली  आहे. शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर संसदेत  15  तासांचा  वेळ  चर्चेसाठी  राखून  ठेवण्यात  आला  आहे. कॉंग्रेस  नेते  गुलाम  नबी  आझाद  यांनी  शेतकरी  आंदोलनावरुन  आक्रमक  होत, महेंद्र  टिकैत  यांचे  नाव  घेत  केंद्र सरकारवर  निशाणा  साधला, ''ब्रिटीश  काळात  शेतकऱ्यांसमोर  ब्रिटीशांनाही  झुकावं  लागलं  होतं. केंद्र  सरकारने  कृषी  कायदे शेतकऱ्यांना  अमान्य  असतील  तर  तात्काळ  रद्द  करावेत.''

Farmers Protest : आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या ट्विटवर केंद्र सरकारने दिली...

तसेच  दिल्लीच्या  सीमेवर  शेतकरी  आंदोलनाला  बसले  आहेत. केंद्र  सरकारचे  अनेक मंत्री, खासदार, नेते  यांनी  शेतकरी  आंदोलनाला  अनेक  वेळा  बदनाम  करण्याचा  प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी  दिल्लीत  प्रवेश  करु  नये  यासाठी  केंद्र  सरकारने  अनेक अडथळे  निर्माण  केले  आहेत. सरकारने  कृषी  कायद्यांच्या  बाबत असणारी आपली  हटवादी भूमिका  सोडून  शेतकऱ्यांचे  एकावे. ‘’मोदी  सरकारला  लढायचंच  असेल  तर  पाकिस्तान आणि  चीनच्या  सीमांवर  लढावे.’’,असे  कॉंग्रेस  नेते  गुलाम  नबी  आझाद  यांनी  म्हटले. 

शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठींबा

प्रजासत्ताक  दिनी  निर्माण  दिल्लीत  निर्माण  झालेला  हिंसाचार  वरुन  गाझीपूर  बॉर्डवर स्थानिक  नागरिक  आणि  आंदोलक  शेतकरी  यांच्यात  हिंसक  झडप  झाली  होती. तसेच कॉंगेस  नेते  राहुल  गांधी  यांनी  मोदी  सरकार  वर  हल्लाबोल  करत,‘’शेतकऱ्यांना  मोदी सरकार घाबरत  आहे. चीन  सीमेवर  भारतीय  जवान  लढत आहेत  मात्र  मोदी  सरकारला जवानानंवर  खर्च  करण्यासाठी  पैसे  नाहीत. केंद्र  सरकार  कृषी  कायद्यांवर  तोडगा काढत  नाही.’’असे  म्हणाले.

संबंधित बातम्या