तुम्ही वापरता तो मास्क गर्दीच्या ठिकाणी प्रभावी नाही: IIT भुवनेश्वर

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून, कोरोनाचे वाढते आकडे मोठे उच्चांक गाठताना दिसत आहेत. तसेच सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात मोठी पावले उचलल्याचे दिसून येते आहेत.

दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून, कोरोनाचे वाढते आकडे मोठे उच्चांक गाठताना दिसत आहेत. तसेच सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात मोठी पावले उचलल्याचे दिसून येते आहेत. मास्क आणि हात धुणे ही कोरोना रोखण्यासाठी सर्वात आवश्यक आहे. त्याच वेळी, लस घेणे देखील कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी एक प्रभावी पाऊल असल्याचे  समजते आहे. आयआयटी भुवनेश्वर यांच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की गर्दीच्या ठिकाणी आणि सामान्य संवादामध्ये सर्जिकल मास्क पूर्णपणे प्रभावी नसतात. (Surgical masks are not effective in crowded places: IIT Bhubaneswar)

गर्दीच्या ठिकाणी बोलताना तोंडातून अतिसूक्ष्म कण बाहेर पडतात त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो, असे या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे. त्यामुळे सामान्यतः वापरले जाणारे मास्क हे या संसर्गाला थांबवण्यास सक्षम नसल्याचे या अभ्यासातून समोर आले आहेत. आयआयटी भुवनेश्वर आणि त्यांच्या कार्यसंघाचे सहायक प्राध्यापक डॉ वेणुगोपाल अरुमुरू यांनी हा अभ्यास केला आहे. या अभ्यासादरम्यान श्वास घेण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला गेला, जेव्हा प्रौढ आणि वयस्क व्यक्ती चालताना आणि बोलतानाचे श्वासोश्वास प्रक्रियांचे निरीक्षण केले गेले. यावेळी असे दिसुन आले की श्वासोश्वास प्रक्रिया सुरु असताना 10 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे थेंब बाहेर पडतात आणि हे थेंब पुढच्या पाच सेकंदात चार फूटांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सर्जिकल मास्क (Surgicle Mask) सामान्य संवादा दरम्यान प्रभावी नसल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. 

राकेश्वर सिंग यांनी सांगितली नक्षलींच्या ताब्यात असतानाची कहाणी -

संबंधित बातम्या