सिंगापुरहून येणाऱ्या विमान सेवा तात्काळ बंद करा; केजरीवालांची केंद्राकडे मागणी 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

कोरोनाचा नवा स्ट्रेन सिंगापुर येथे सापडला असून तो लहान मुलांसाठी खूप घातक आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा स्ट्रेन (Stren) सिंगापुर (Singapore) येथे सापडला असून तो लहान मुलांसाठी खूप घातक आहे. यामुळे केंद्र सरकारने सिंगापुरहून येणाऱ्या विमान (Flights) सेवा तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केली आहे. 

केजरीवाल म्हणाले, ''सिंगापुरमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला असून, तो लहान मुलांसाठी खूप घातक आहे. यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट देखील येऊ शकते. माझी सरकारला विनंती आहे त्यांनी सिंगापुरहून येणाऱ्या विमानसेवा तात्काळ रद्द करुन लहान मुलांच्या लसीकरणाच्या प्राथमिकतेबाबत गांभीर्याने विचार करावा,'' (Immediate closure of flights from Singapore Kejriwals demand to central government)

COVID-19 Vaccination: ''गावाचं 100 टक्के लसीकरण करा आणि मिळवा 10 लाख...

सिंगापुरचे शिक्षणमंत्री चान चुन सिंग यांच्या सांगण्यानुसार, ''कोरोनाचा हा नवा  स्ट्रेन लहान मुलांना जास्त नुकसानकारक ठरु शकतो. त्यामुळे येथील  शाळा 28 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भारतात सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांवर जास्त परिणाम करु शकतो, अशी चेतावणी सिंगापूर सरकारने दिली आहे. तसेच येथील सरकारने शाळा बंद करण्याबरोबरच तरुणांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे.''  

संबंधित बातम्या