भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधूच्या पाणी वाटपाबाबत होणार महत्त्वपूर्ण बैठक 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 मार्च 2021

जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा पूर्णपणे बंद थांबल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही देशांमधील संबंध काही प्रमाणात सुधारत असल्याचे दिसते आहे.

जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा पूर्णपणे बंद थांबल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही देशांमधील संबंध काही प्रमाणात सुधारत असल्याचे दिसते आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मंगळवारपासून सिंधू नदीच्या पाणीवाटपाबाबत स्थायी समितीची बैठक होणार आहे. सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबात तब्बल तीन वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये ही बैठक पार पडणार आहे. 

दिल्ली सरकारला झटका; उपराज्यपालांना व्यापक अधिकार देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील 1960 च्या जल कराराअंतर्गत स्थायी समितीची स्थापना करण्यात आली होती. यानुसार 23 आणि 24 मार्च रोजी या आयोगाची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीज चौधरी यांनी या बैठकीबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत बोलताना जाहिद हफीज चौधरी यांनी, दोन्ही देशांमधील कराराच्या वेळी या आयोगाची बैठक वर्षातून एकदा तरी घेण्याचे ठरवण्यात आल्याचे सांगितले. आणि त्यानुसारच ही बैठक होणार असल्याचे नमूद केले.     

Assam Election : ''काँग्रेस व एआययूडीएफ सत्तेत आल्यास राज्यातील...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सिंधू नदी व तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वितरणावर नजर ठेवणे ही आयोगाची जबाबदारी आहे. आयोगाच्या या बैठकीत पाकिस्तान पाकल दुल आणि लोवर कलनाई हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट ऑफ इंडियाच्या डिझाईनवर आक्षेप घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 2019 मध्ये पुलवामा घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अनेक विषयांवर होणाऱ्या चर्चा पूर्णपणे थांबल्या होत्या. आणि याच अनुषंगाने सिंधू जल आयोगाची बैठक होऊ शकली नव्हती. परंतु मंगळवारपासून पाणीवाटपाबाबत चर्चेची फेरी सुरू झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध हळू-हळू पूर्ववत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

 

संबंधित बातम्या