जगभरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

जगभरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विदेशातील भारतीय नागरिकांना (ओसीआय) कार्डधारकांना यापुढे प्रवासादरम्यान त्यांचे जुने पासपोर्ट आपल्याबरोबर आणण्याची आवश्यकता राहणार नाही.

जगभरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विदेशातील भारतीय नागरिकांना (ओसीआय) कार्डधारकांना यापुढे प्रवासादरम्यान त्यांचे जुने पासपोर्ट आपल्याबरोबर आणण्याची आवश्यकता राहणार नाही. केंद्राने आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करून ओसीआय कार्ड रिन्यू करण्याची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा 20 ते 50 वर्षे वयाच्या दरम्यान असलेला ओसीआय कार्डधारक जेव्हा दुसऱ्या देशात राहत असतो तेव्हा त्या देशात नवीन पासपोर्ट बनविण्यासाठी नवे ओसीआय कार्ड बनविणे अनिवार्य असते.  मात्र ही अट काढून टाकण्यात आल्याने ओसीआय कार्डसह जुना पासपोर्ट ठेवणे आता बंधनकारक राहणार नाही. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर होणार बायपास शस्त्रक्रिया   

आता कोणत्याही प्रवासादरम्यान ओसीआय कार्डसह जुना पासपोर्ट आणण्याची अनिवार्य अट काढून टाकण्यात आल्याने प्रदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिलासा मिळला आहे. जगभरातील परदेशी नागरिकांच्या हितासाठी काम करणारे जयपूर फूट यूएसएचे अध्यक्ष प्रेम भंडारी हे यासाठी बर्‍याच काळापासून केंद्र सरकारच्या संपर्कात होते. ओसीआयशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यात यावीत, जेणेकरुन लोकांच्या समस्या दूर होतील, अशी त्यांची इच्छा होती. आता केंद्र सरकारने या अटी काढून टाकल्याने प्रेम भंडारी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला आणि नागरी उड्डाण  सचिव प्रदीपसिंग खरोला यांनी गेल्या एक वर्षात अनिवासी भारतीय व ओसीआयचे वेगवेगळे प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचेही प्रेम भंडारी यांनी आभार मानले.

म्यानमार लष्कराचे हवाई हल्ले; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची थायलंडकडे धाव

वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झाली होती ही यंत्रणा 

खरंतर, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात परदेशात राहणाऱ्या आणि तेथील नागरिकांना भारतीय असल्यासारखे वाटत राहावे, यासाठी ही अट लागू करण्यात आली होती. भारताबाहेरील नागरिकांना  (ओसीआय) ज्यांना आनिवासी भारतीय (एनआरआय) म्हटले जाते. त्यांच्यासाठी, पासपोर्टप्रमाणेच हे कार्ड देणे सुरू करण्यात आले.  याला आपण  दीर्घ मुदतीचा व्हिसा म्हणू शकतो जो भारतीयांना लागू आहे. जेणेकरून त्यांना केवळ त्यांच्या देशासाठी वारंवार व्हिसा घ्यावा लागणार नाही आणि केवळ या कार्डमुळे त्यांना दीर्घ काळासाठी व्हिसा घेण्याची गरज पडणार नाही. 

जून पासपोर्ट ठेवणे अनिवार्य असण्याचे कारण काय ?  
ओसीआय कार्डमध्ये नागरिकांच्या स्वतःच्या देशाच्या पासपोर्टचा नंबर असतो. त्यामुळे परदेशातून भारतात येताना, भारतीय मूळचे ओसीआय कार्डधारकांना जुन्या आणि नव्या पासपोर्टवरील नंबर्सची जुळवाजुळव करण्यासाठी कार्डसह जुना पासपोर्ट ठेवणेदेखील अनिवार्य होते. दोन पासपोर्ट एकत्र ठेवण्याचा हा किचकट नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी कार्ड धारक गेल्या अनेक वर्षांपसून करत होते. तसेच, जुन्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर लोक दोन-दोन पासपोर्टही ठेवत नाही. मात्र ओसीआय क्रमांकाची जुळवाजुळव करण्यासाठी जूना पासपोर्ट ठेवणे बंधनकारक होते. परंतु आता केंद्र सरकारने ही यात रद्द केल्यामुळे आता परदेशी भारतीय नागरिकांना दिलासा मिळल आहे. 

 

 

संबंधित बातम्या