
In a viral video, Rani Jiteshwari Of Panna Royal Family is seen making a fuss during the Janmashtami aarti:
जन्माष्टमीच्या आरतीवेळी पन्ना राजघराण्यातील महाराणी कथितपणे मंदिरात गोंधळ घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी पन्ना राजघराण्यातील महाराणी जितेश्वरी विधवा असल्यामुळे त्यांना मंदिराच्या बाहेर काढल्याचा दावा काहीजन करत आहेत.
तर दुसरीकडे घटनेच्या वेळी राणी दारूच्या नशेत होत्या असा आरोप करत, मंदिराच्या प्रतिष्ठेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये राणी जितेश्वरी जन्माष्टमीच्या आरतीदरम्यान गोंधळ घालताना दिसत आहेत. हा सर्व गोंधळ पाहूण तेथे उपस्थित असलेल्या पुजारी भक्तांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा तोल गेला. यानंतर पुजारी आणि महिला पोलिसाने त्यांना मंदिराच्या बाहेर काढले.
मंदिर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जितेश्वरी देवी यांनी गुरुवारी मंदिरात सुरू असलेल्या आरतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्या खाली पडली."
मंदिर समितीच्या तक्रारीवरून कोतवाली शरह पोलिसांनी राणी जितेश्वरी यांच्याविरुद्ध मंदिराच्या प्रतिष्ठेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जन्माष्टमी हा एक हिंदू सण आहे जो भाद्रपद महिन्याच्या पंधरवड्यात दिवशी देव कृष्णाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. कृष्णाच्या आख्यायिकेत आठव्या क्रमांकाचे आणखी एक महत्त्व आहे की तो त्याच्या आई देवकीचा आठवा मुलगा आहे.
पन्ना राजघराणे डायमंड किंग या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे आतापर्यंत 18 राज्यकर्ते झाले आहेत. यापैकी १८ वे शासक महाराज पन्ना राघवेंद्र सिंह जु देव यांचे जानेवारी महिन्यात नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पत्नीचे नाव जितेश्वरी देवी आहे. त्यांचा मुलगा कुंवर छत्रसाल II यांचाऔपचारिकपणे 19 वे शासक म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.