Video: बंगालमध्ये Jharkhand काँग्रेसच्या 3 आमदारांकडून मोठी रोकड जप्त

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी शनिवारी झारखंडच्या 3 आमदारांकडून मोठी रोकड जप्त केली.
mony
mony Dainik Gomantak

West Bengal Police: पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी शनिवारी झारखंडच्या 3 आमदारांकडून मोठी रोकड जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, रोकड मोजण्यासाठी मोजणी यंत्रे मागवण्यात आली आहेत.

दरम्यान, हावडा शहराच्या डीसीपी प्रतीक्षा झाखरिया यांनी सांगितले की, 'राजेश कछाप, नमन विक्सेल कोंगारी आणि इरफान अन्सारी यांच्याकडून ही रोकड जप्त केली आहे. तिघेही झारखंड (Jharkhand) काँग्रेसचे (Congress) नेते आहेत.'

mony
West Bengal: 'हा पैसा पार्थचा आहे', अर्पिता मुखर्जीने दिली ईडीसमोर कबुली

दुसरीकडे, प्रतीक्षा झाखरिया यांनी पुढे सांगितले की, 'पोलिसांनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक कार थांबवली, ज्यामध्ये कॉंग्रेसचे तीन आमदार होते. त्यानंतर कारची तपासणी केली असता त्यांच्याकडून मोठी रोकड जप्त करण्यात आली.'

टीएमसीने कारवाईवर प्रश्न उपस्थित केले

आमदारांकडून रोख रक्कम जप्त केल्यानंतर, टीएमसीने (TMC) आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ रिट्विट केला, ज्यामध्ये म्हटले की, 'पूर्णपणे धक्कादायक! कारमधून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. झारखंड काँग्रेसच्या आमदारांना हावडा येथे आडवण्यात आले. ईडी काही निवडक लोकांवरच कारवाई करत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com