सर्वसामान्यांच्या गाडीत 2-3 एअरबॅग का?

मीडल क्लास नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेतात. आणि त्यांच्या कारमध्ये सुरक्षेसाठी पुरेशा एअरबॅग नाहीत. अपघातात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सवाल?
सर्वसामान्यांच्या गाडीत 2-3 एअरबॅग का?
Nitin GadkariDainik Gomantak

दिल्ली: कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या या श्रीमंतांच्या महागड्या गाडीमध्ये 8 एअरबॅग्स (Airbags) बसवतात. मात्र सर्वसामान्य नागरिक हे लहान कार खरेदी करीत असतात. आणि या गाडीमध्ये मात्र केवळ 2-3 एअरबॅग्स असतात. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग (national highway)मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व लहान कारमध्ये सुद्या सीटच्या मर्यादेनुसार एअरबॅग पाहिजेत. अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार निर्मिती कंपन्यांना केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मुलाखतीत सांगितले की, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लहान आणि स्वस्त कारमध्ये गरजेनुसार एअरबॅग्ज (airbags) बसवण्याचे आवाहन करत आहोत. नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, ज्यावेळी हायर टॅक्सेशन, सेफ्टी नियमांची अमलबजावणी याबाबत वाहन उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे. यामुळे कारच्या किंमतीत वाढ होत असल्याचे कार निर्मात्या कंपन्यांचे म्हणणे आहे.

Nitin Gadkari
देशात अमेरिकेसारखेच रस्ते करणार : नितीन गडकरी

कमीत कमी 6 एअरबॅग :

नितीन गडकरी यांनी म्हटले की, लोअर, मीडल क्लास नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेतात. आणि त्यांच्या कारमध्ये सुरक्षेसाठी पुरेशा एअरबॅग नाहीत. अपघातात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून सर्वच कार उत्पादकांना आवाहन करतो की, वाहनाच्या सर्व वेरिएंट आणि सेगमेंटमध्ये किमान 6 एअरबॅग बसवाव्यात, जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांनाही सुरक्षित प्रवास करता येऊ शकेल.

किंमतीत वाढ:

एअरबॅग्सची संख्या वाढली की कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. मात्र अपघातामध्ये सामान्य नागरिकांही संरक्षण मिळाले. असे गडकरीनी सांगितले. बड्या लोकांसाठी 8 एअरबॅग देता. मग स्वस्त कार सर्वसामान्य नागरिक वापरत असतात. आणि त्यांना फक्त 2 ते 3 एअरबॅग असतात. असे का? असा सवाल नितीन गडकरी यांनी कार निर्मिती कंपन्यांना विचारला.

Related Stories

No stories found.