भारतीय नौदलासाठी युद्धनौका तयार करण्याच्या ‘प्रोजेक्ट १७ ए’चे आज उद्‌घाटन

PTI
सोमवार, 14 डिसेंबर 2020

भारतीय नौदलासाठी युद्धनौका तयार करण्याच्या ‘प्रोजेक्ट १७ ए’ प्रकल्पाचे आज सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे.

कोलकता : भारतीय नौदलासाठी युद्धनौका तयार करण्याच्या ‘प्रोजेक्ट १७ ए’ प्रकल्पाचे आज सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) या सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनीतर्फे ‘प्रोजेक्ट १७ ए’ अंतर्ग तीन युद्धनौका बांधल्या जाणार आहेत. 

‘प्रोजेक्ट १७ ए’ अंतर्गत एकूण सात युद्ध जहाजांची बांधणी होणार असून त्यापैकी चार जहाजे माझगाव डॉकतर्फे तयार केली जाणार आहेत. या चारपैकी एकाचे, ‘आयएनएस निलगीरी’चे जलावतरण गेल्या वर्षी झाले.
 ‘जीआरएसई’तर्फे तयार केल्या जाणाऱ्या तीन जहाजांपैकी पहिले जहाज २०२३ पर्यंत आणि इतर दोन जहाजे २०२४ आणि २०२५ पर्यंत नौदलाला मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार २९४ कोटी रुपये खर्च येणार आहे. या तिन्ही जहाजांची लांबी १४९ मीटर असेल तर, वजन ६६७० टन इतके असेल, असे सूत्रांनी सांगितले. 

संबंधित बातम्या