सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वद्रांची नऊ तास चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 5 जानेवारी 2021

ब्रिटनमधील मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांची झाडाझडती घेतली.

नवी दिल्ली :  ब्रिटनमधील मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांची झाडाझडती घेतली. सध्या करचुकवेगिरीच्या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे. तब्बल नऊ तास वद्रा यांची चौकशी करुन प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

संबंधित बातम्या