'इनकम टॅक्स'चे छापे; येडीयुरप्पा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ?

यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Former Chief Minister B. S. Yeddyurappa) यांचे स्वीय सहाय्यक उमेश यांच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे.
'इनकम टॅक्स'चे छापे; येडीयुरप्पा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ?
Former Chief Minister B. S. YeddyurappaDainik Gomantak

आयकर विभागाच्या गोवा-कर्नाटक (Karnataka) कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पहाटे बंगळूरुसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Former Chief Minister B. S. Yeddyurappa) यांचे स्वीय सहाय्यक उमेश यांच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे. जलसंपदा विभागामधील (Irrigation Department) भ्रष्टाचार प्रकरणी आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या बंगळूरु (Bangalore) आणि गोवा कार्यालयामधील साधारण तीनशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत.

Former Chief Minister B. S. Yeddyurappa
Karnataka: येडीयुरप्पा मुख्यमंत्री पद सोडणार ? जाणून घ्या

दरम्यान, जलसंपदा विभागामधील तब्बल 25000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे टाकण्यात आले. जलसंपदा विभागातील कंत्राटे देताना भ्रष्टाचार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे सचिव उमेश (Umesh) हे मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडिच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमीशन घेतल्याचा संशय आहे. मात्र दुसरीकडे येडीयुरप्पा उमेश यांच्यावरील आयकर विभागाच्या छाप्यामुळे नाराज झाले आहेत. उमेश यांच्यासह काही कंत्राटदार, चार्टर्ड अकांउटंट यांच्यासह येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. विजयेंद्र (B. Vijayendra) यांच्या जवळच्या काही व्यक्तींवरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्याचबरोबर बंगळूरु, बागलकोट, तुमकुर येथे आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यामध्ये काही बेकायदेशीर कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.