दिशा रवीच्या पोलिस कोठडीत वाढ

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

दिल्ली पोलिसांना दिशाची चौकशी करण्यासाठी एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

नवी दिल्ली: कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकिय वातावरण तापलं असताना टूलकिट प्रकरणात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी बंगळूरमधून अटक केली होती. त्यांनतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले.आता मात्र दिशा रवीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांना दिशाची चौकशी करण्यासाठी ही एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. दिशाची आता दिल्ली पोलिसांना टूलकिट प्रकरणातील सहआरोपीसंह चौकशी करता येणार आहे. दिशा ही टूलकिट प्रकरणातील एक आरोपी आहे. दिशाची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपणार होती. म्हणून तिला न्यायालायात हजर करण्यात आले होते.

राहुल गांधींनी चालवला ट्रॅक्टर; मनरेगावरून सरकारला सुनावले

पर्यावरणवादी दिशा रवीला टूलकिट प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुणावली होती. कोठडीची मुदत सोमवारी संपणार होती, मात्र लगेच दिल्ली पोलिसांनी दिशाच्य़ा कोठडीची मागणी न्यायालयात केली. शनिवारी दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुणावनी करण्यात आली. न्य़ायालयाने तिच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला असून, मंगळवारी न्य़ायालय जामीन अर्जावरील निर्णय देणार आहे. मात्र या टूलकिट प्रकरणातील दिशाचे सहआरोपी असणारे शांतनु मुळुक आणि निकीता जेकब यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.   

संबंधित बातम्या