नमाजाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उत्तर प्रदेशात कडेकोट बंदोबस्त

उत्तर प्रदेशातील सर्व विभाग आणि जिल्ह्यांमधील सुरक्षेत केली वाढ
नमाजाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उत्तर प्रदेशात कडेकोट बंदोबस्त
Police Dainik Gomant

दिल्लीतील ईडी कार्यालयात राहुल गांधी यांना एक दिवसाची मुदत देली असली तरी उद्या शुक्रवारी पुन्हा कडेकोट बंदोबस्तात चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीचा निषेध नोंदवत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांची देशातील अनेक ठिकाणी निदर्शने सुरु आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झटापटही झाल्याचं वृत्त आहे. यात पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याचं चित्रं आहे. (Increased security in Uttar Pradesh on the backdrop of Namaz )

तसेच एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ 10 जून रोजी नमाजानंतर उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उसळला होता. यामूळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Police
धक्कादायक ! नवऱ्यानेच केली बायकोची निर्घुण हत्या

नागरी समाज आणि शांतता समिती सदस्यांसोबत बैठका सुरू

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले कि, राज्यात शुक्रवारच्या नमाजासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांतील धार्मिक नेते, नागरी समाज आणि शांतता समिती सदस्यांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी, पोलीस चौकीचे प्रभारी तसेच वरिष्ठ प्रादेशिक पोलीस अधिकारी सहभागी होत आहेत.

Police
Jammu And Kashmir: हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येचा लष्कराने घेतला बदला

गृह विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी आणि पोलिस महासंचालक डीएस चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व विभाग, परिक्षेत्र, परिक्षेत्र आणि जिल्ह्यांमधील सुरक्षा व्यवस्थेचा संयुक्तपणे आढावा घेतला. त्यानुसार हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

जिल्ह्यांमध्ये पोलिसांकडून पायी गस्त

ते म्हणाले, "राज्यभरात कडक दक्ष राहण्याच्या आणि कोणत्याही प्रकारच्या अप्रिय परिस्थितीला काटेकोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांकडून पायी गस्त आणि निमलष्करी दलाच्या फ्लॅग मार्चच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच कोणत्याही प्रकारचा गडबड होऊ नये यासाठी सर्व संवेदनशील ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com