मिथुन चक्रवर्ती यांच्या सुरक्षेत वाढ; केंद्राने दिली ‘वाय प्लस’ सुरक्षा

मिथुन चक्रवर्ती यांच्या सुरक्षेत वाढ; केंद्राने दिली ‘वाय प्लस’ सुरक्षा
Increased security for Mithun Chakraborty Y Plus security provided by the Center

कोलकाता : आगामी काळात पाच राज्य़ांमध्ये निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकतेच भाजपमध्य़े दाखल झालेले जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना केंद्र सरकारने ''वाय प्लस'' सुरक्षा दिली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयसीएफ) यांनी मिथुन चक्रवर्ती यांना ही सुरक्षा प्रदान केली आहे. विशेष सुरक्षेच्या पथकाला विशेष सुरक्षा गट म्हणून ओळखले जाते. कोलकातामधील ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेत अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. आणि पश्चिम बंगालमधील प्रचार मोहिमेदरम्यान त्यांच्याबरोबर हे सुरक्षा बल असणार आहेत. 294 विधानसभा सदस्य असणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधी दरम्यान आठ टप्प्यात पार पडणार आहेत. तसेच झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनाही अशाच प्रकारची वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.     
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com