भारत-चीन संबंध: पुन्हा लष्करी पातळीवर चर्चा होण्याची शक्यता

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

भारत आणि चीन दरम्यान मागील वर्षभरापासून तणाव सुरु होते, मात्र मागील काही  दिवसांपासून दोन्हीही देशांनी वादग्रस्त ठिकांणांहून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयांमुळे उभय देशांतील संबंध सुधारण्याचे चिन्ह दिसू  लागले आहेत.

भारत आणि चीन दरम्यान मागील वर्षभरापासून तणाव सुरु होते, मात्र मागील काही  दिवसांपासून दोन्हीही देशांनी वादग्रस्त ठिकांणांहून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयांमुळे उभय देशांतील संबंध सुधारण्याचे चिन्ह दिसू  लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी काळात भारत आणि चीन दम्यान होणाऱ्या संवादामध्ये गोग्रा हॉट स्प्रिंग्स आणि देप्सांग मैदानावरील वादग्रस्त ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. (India and China are likely to discuss the withdrawal of troops from Gogra Hot Springs and Depsang ground)

भारत आणि चीन या दोन्हीही देशांमध्ये सुमारे 3488 किमीची भु-सीमा आहे. या एकूण सीमाभागात अनेक वादग्रस्त ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आजपर्यंत अनेकदा भारत आणि चीनचे सैन्य आमने सामने आले आहेत. मात्र अलीकडच्या काळात दोन्हीही देशांकडून सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने सैन्य मागे घेण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 9 एप्रिल रोजी भारत आणि चीन दरम्यान लष्करी पातळीवरील चर्चा होऊ शकते. पूर्व लडाख परिसरातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचे  समजते आहे.  या चर्चेत गोगरा, हॉट स्प्रंग्स आणि देप्सांग मैदानातील काही ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा केली जाण्याची असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. 

पॅंगॉन्ग लेक क्षेत्रात सैन्याने यशस्वीरित्या मागे घेतल्यानंतर केल्यानंतर भारत आणि चीनमधील (Indo-China) गोगरा हिल्स (Gogra Hills) आणि देप्सांगच्या (Depsang) मैदानावरून सैन्य मागे घेण्याची चर्चा आहे. गेल्या दोन महिन्यात सैन्य (Indian Army) आणि राजकीय पातळीवर झालेल्या व्यापक चर्चेनंतर दोन्ही सैन्याने सर्वात वादग्रस्त पॅंगॉन्ग लेक प्रदेशातून दोन्हीही सैन्यांनी  माघार घेतल्याचे समजते आहे. दरम्यान यासाठी भारत आणि चीन सैन्य दलासाठी दोन्ही बाजूंनी कोर कमांडर स्तरावरील चर्चेच्या दहा फेऱ्या झाल्या आहेत.

संबंधित बातम्या