7 जोनेवारीपर्यंत ब्रिटन-भारत विमानसेवा बंद: केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

भारतात जवळपास २० प्रवाशांमध्ये करोना पॉझिटिव्हचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली असल्याची माहीती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून दिली.

नवी दिल्ली:  कोरोनाचा नवा अवतार भारतामध्येही पोहचला आहे. कोरोनाच्या या प्रसारामुळे आता भारतातही दक्षतेने हालचाल करण्याची पाऊलं उचलली आहे. भारतात जवळपास २० प्रवाशांमध्ये करोना पॉझिटिव्हचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली असल्याची माहीती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून दिली.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही या  नव्या करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. परंतु त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून करोनाच्या नव्या विषाणूनं देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी ज्या सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ती संख्या आज (३० डिसेंबर) २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या