केंद्र सरकारकडून ‘पबजी’वर बंदी; आणखी ११८ ॲपवर फुली

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून बुधवारी सायंकाळी याबाबतची माहिती देण्यात आली. आता बंदी घातलेल्यांमध्ये मोबाईल गेमच्या चिनी अॅपची संख्या सर्वाधिक आहे.

नवी दिल्ली: भारत-चीन यांच्यातील तणाव पुन्हा वाढला असतानाच केंद्र सरकारने पबजीसह चीनशी संबंधित आणखी ११८ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वभौमत्वाला चिनी अॅपपासून मोठा धोका असल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून बुधवारी सायंकाळी याबाबतची माहिती देण्यात आली. आता बंदी घातलेल्यांमध्ये मोबाईल गेमच्या चिनी अॅपची संख्या सर्वाधिक आहे. 

चीनने डोकलाम व अलीकडे पँगाँग सरोवराच्या परिसरात भारताची कुरापत काढल्यानंतर भारताने आर्थिक क्षेत्रात चीनचे नाक दाबण्याचे विविध उपाय सुरू केले आहेत. 

केंद्राने अलीकडच्या काळात टिकटॉकसह आधी ४७ व नंतर ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यापाठोपाठ आज चीनशी संबंधित ११८ अॅपना भारताचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या