''भारताने मतदानाच्या वेळी तटस्थ राहून तमिळ लोकांच्या भावनांचा विश्वासघात केला''

India betrayed the sentiments of the Tamil people by remaining neutral during the polls
India betrayed the sentiments of the Tamil people by remaining neutral during the polls

श्रीलंकेतील वांशिक हक्कांच्या पायमल्लीबाबत संयुक्त राष्ट्र संघात घेण्यात आलेल्या मतदानात भारताने तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णत:हा चुकीचा असून त्याची शिक्षा तामिळनाडूमधील मतदारांनी अद्रमुक आणि भाजप यांच्या आघाडीला आगामी विधानसभा निवडणूकीत द्यावी, अशी टिका कॉंग्रेस नेते पी. चिदंमबरम यांनी केली आहे.

भारताकडून मतदानाच्या बाबतीत बाळगलेली तटस्थता म्हणजे तमिळ लोकांचा विश्वासघात असल्याची टीका चिदंमबरम यांनी केली आहे. ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले की, 'तामिळनाडूच्या लोकांच्या भावनांचा भारताने संयुक्त राष्ट्रसंघात घेतलेल्या निर्णयामुळे अपमान झाला आहे. भारताने मतदानाच्या वेळी तटस्थ राहून तमिळ लोकांच्या भावनांचा विश्वासघात केला आहे. तमिळ जनतेच्या संयुक्त भावनांचा त्यामध्य़े विचार करण्यात आला नाही.
तामिळनाडूमधील मतदार मोदी सरकारच्या या निर्णयाच्या बाबतीत विधानसभा निवडणूकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तामिळ आस्मितेचा आणि तमिळ लोकांच्या हिताचा या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारे विचार करण्यात आलेला नाही. (India betrayed the sentiments of the Tamil people by remaining neutral during the polls)

संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क परिषदेने श्रीलंकेतील यादवी युध्दात अनेक तामिळ लोकांची हत्या करण्यात आली होती, त्याच अनुषंगाने मानवी हक्काच्या मुद्द्यावर ठराव मंजूर करण्यात आला. 2008-09 मध्ये ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम’ या संघटनेच्या विरोधात कारवाई करताना तेथील लष्काराने मानवी हक्कांचा भंग केला होता.

भारताने मानवी हक्कांच्या मुद्द्यावर तटस्थ राहताना स्पष्ट केलं की, श्रीलंकेतील मानवी हक्क मुद्द्याबाबत दोन मुददे विचारात घेण्यात आले आहेत. एक म्हणजे आमचा श्रीलंकेतील तमिळींना पाठिंबा आहे. त्यांच्याबाबत सन्मान, समानता, न्याय, शांतता हे मुद्दे आम्हाला मान्य आहेत. श्रीलंका हा एक देश म्हणून आम्हाला श्रीलंकेतील एकता, प्रादेशिक एकात्मता यांनाही महत्त्व देणं भाग आहे. श्रीलंकेने राजकिय अधिकांराचे विकेंद्रीकरण करावं तसेच तमिळ लोकांच्य़ा आशा आकांक्षा पूर्ण करण्याची प्रक्रिया पुढे न्यावी, असे आवाहन भारताने केले आहे. 


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com