भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दर केले कमी; जाणून घ्या नवी किंमत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन लस आता 400 रुपयात मिळणार आहे.

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोवीशिल्ड(Covishield)या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर आता भारत बायोटेकने (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लसींचे दर कमी केले आहेत. कोव्हॅक्सिनचा दर आता 200 रुपयांनी घटला आहे. राज्य सरकारांना(State governments)  कोव्हॅक्सिन लस आता 400 रुपयात मिळणार आहे. 

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा वाढवलेला दर जाहीर केला होता. त्यानुसार आता राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन 600 रुपये प्रति डोस मिळणार आहे. तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपये प्रति डोस या किमतीला मिळत होता. मात्र आता लसींच्या किमतीत घट करण्यात आली आहे.

''भारताला कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे''

दरम्यान, आता राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन 400 रुपयांना प्रति डोस  मिळणार आहे. तर खासगी रुग्णालयांना मात्र 1200 रुपयेच प्रति डोस किंमत मोजावी लागणार आहे. भारत बायोटेक कंपनीने पत्रक प्रसिध्द करत ही माहीती दिली आहे. भारत बायोटेकने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलं की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही कोव्हॅक्सिन लस राज्य सरकारांना आता 400 रुपये प्रति डोस मिळणार आहेत. 
 

संबंधित बातम्या