देशात अमेरिकेसारखेच रस्ते करणार : नितीन गडकरी

ते म्हणाले की, सध्या देशात दररोज 38 किमी रस्ता तयार केला जात आहे तर पूर्वी एका दिवसात फक्त दोन किमी रस्ता तयार केला जात होता.
India Can Hope  Getting Highways Of American Standard In Next Three Years Nitin Gadkari
India Can Hope Getting Highways Of American Standard In Next Three Years Nitin GadkariDainik Gomantak

केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी सध्या देशात राष्ट्रीय महामार्गांचे (National Highway) निर्माण वेगाने केले जात आहे असे सांगत संपूर्ण देश पुढील तीन वर्षात अमेरिकन दर्जाचे रस्ते आणि महामार्ग आपल्या देशात सुद्धा निर्माण होतील अशी अपेक्षा करू शकतो. ते म्हणाले की, सध्या देशात दररोज 38 किमी रस्ता तयार केला जात आहे तर पूर्वी एका दिवसात फक्त दोन किमी रस्ता तयार केला जात होता.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह गडकरींनी बनसाकांठाच्या डीसा शहरात 3.75 किलोमीटर लांबीचा चार लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचे उद्घाटन केले.(India Can Hope Getting Highways Of American Standard In Next Three Years: Nitin Gadkari)

तसेच गडकरी म्हणाले की, गुजरात राज्यात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 'भारतमाला प्रकल्प' अंतर्गत अनेक प्रकल्प सुरू आहेत त्यांनी रूपानी यांना पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी भूसंपादनाची समस्या लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वेगाने पसरत आहे. मला विश्वास आहे की येत्या तीन वर्षात संपूर्ण देशाला अमेरिकेसारखेच महामार्ग मिळतील. एक काळ होता जेव्हा देशात दररोज फक्त दोन किलोमीटरचे रस्ते बांधले जात होते, परंतु आज आपण दररोज 38 किलोमीटरचे रस्ते बांधत आहोत.असे सांगत त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.

India Can Hope  Getting Highways Of American Standard In Next Three Years Nitin Gadkari
Pegasus spyware: भारतीय वृत्तपत्रं भ्याड; चिंदबरम आक्रमक

गडकरी म्हणाले की, महामार्ग मंत्रालयाने गुजरातमध्ये अनेक प्रकल्प ताब्यात घेतले आहेत, ज्यात भारतमाला प्रकल्पांतर्गत 25,370 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह बांधण्यात येणाऱ्या 1,080 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा समावेश आहे. इतर प्रकल्पांमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आहे जो गुजरातच्या सात जिल्ह्यांतून जाईल.

तसेच वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाचा भाग असलेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवर काम जोरात सुरू आहे. गडकरी म्हणाले की, वडोदरा ते दक्षिण गुजरातमधील किम पर्यंत 8,711 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 125 किमी रस्त्याचे बांधकाम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल तसेच अमृतसर-जामनगर आर्थिक कॉरिडॉरचे काम सुरू करण्यासाठी उद्घाटनासाठी वेळ देण्याची विनंती पंतप्रधानांना करण्यात आली असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com